आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका अायुक्त-स्थायी समितीत ‘काटाकाटी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात श्वानांनी अाक्रमक पवित्रा धारण केला असताना त्यांना निर्बीजीकरणाच्या माध्यमातून वेसण घालण्यास केवळ स्थायी समितीचा ठराव नसल्यामुळे अाराेग्य विभागाला अडचणी येत अाहेत. या पार्श्वभूमीवर अाता अायुक्तांच्या अादेशानुसार, अाराेग्य विभागाने पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही ठराव नसल्याचे कारण देत श्वान निर्बीजीकरणाच्या मंजूर ठेकेदाराला काम देण्याच्या हालचाली सुरू केल्या अाहेत. त्यामुळे अाता ठरावावरून स्थायी समिती अायुक्तांमध्ये एकमेकांना शह देण्यासाठी काटाकाटी रंगण्याची चिन्हे अाहेत.
महापालिका क्षेत्रातील कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी दरवर्षी श्वान निर्बीजीकरणाची प्रक्रिया खासगीकरणातून राबवली जाते. त्यासाठी जवळपास ७५ लाख रुपयांची तरतूदही असते. त्यातून संबंधित ठेकेदारास जितक्या शस्त्रक्रिया हाेतील तितकी रक्कम अदा केली जाते. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्यामुळे या कालावधीत श्वान निर्बीजीकरणाच्या जास्तीतजास्त शस्त्रक्रिया हाेत असतात. त्यामुळे या कालावधीत ठेक्याचे महत्त्वही अधिक असते. या पार्श्वभूमीवर अाराेग्य विभागाकडून जुलै २०१५ राेजीच्या स्थायी समिती बैठकीत श्वान निर्बीजीकरणाच्या ठेक्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात अाला. स्थायी समितीनेही सरळपणे प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रत्यक्षात पंधरा दिवस उलटल्यानंतरही ठराव नसल्यामुळे श्वान निर्बीजीकरणाचे काम सुरू झालेले नाही. दुसरीकडे उच्छाद करणाऱ्या कुत्र्यांच्या तक्रारी वाढत असल्यामुळे अाराेग्य विभाग मेटाकुटीला अाला अाहे. सद्यस्थितीत अाराेग्य विभागाचेच कर्मचारी कुत्रे पकडण्यासाठी कार्यरतही करण्यात अाले अाहेत. या पार्श्वभूमीवर अाता स्थायीच्या ठरावाची प्रतीक्षा करता पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यामुळे अायुक्तांच्या विशेषाधिकारात प्रस्ताव मंजुरीच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. त्यानुसार अाराेग्य विभागाकडून अायुक्त कार्यालयाकडे प्रस्तावही पाठवला जात असल्याचे समजते.

रामकुंड परिसरात कुत्र्यांचा उच्छाद
सिंहस्थाच्यापार्श्वभूमीवर रामकुंड, गाेदाघाट परिसरात भाविकांची गर्दी वाढली अाहे. त्यांना अन्नदान करण्यासाठी माेठ्या प्रमाणात संस्थांनी पुढाकार घेतला अाहे. त्यामुळे या परिसरात सध्या माेठ्या प्रमाणात अन्नसामुग्री उपलब्ध असल्याचे हेरून कुत्र्यांनीही याच भागात डेरा जमवल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. त्यातून कुत्र्यांच्या टाेळक्याकडून भाविकांवर हल्ले करण्याचे प्रकार सुरू झाले असून, या पार्श्वभूमीवर श्वान निर्बीजीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करणे कसे गरजेचे अाहे हेही पटवून दिले जात अाहे. यासंदर्भात काही भाविकांनी थेट अायुक्तांकडेच तक्रार केल्याचेही अाराेग्यधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...