आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वच्छ भारत अभियाना’साठी सरसावला महिंद्रा उद्योग, सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसह विद्यार्थ्यांचे करणार प्रबोधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या आवाहनाला प्रतिसाद देत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने अभियान राबविण्यास सुरुवात केली. हे अभियान केवळ दिखाऊ ठरू नये, यासाठी त्यात ठेवतानाच त्यात कंपनीचे 3500 कामगार अधिकारी सहभागी होणार असल्याचे नाशिक इगतपुरी प्लांटचे उपाध्यक्ष हिरामण आहेर यांनी सांगितले.
औद्योगिक वसाहतीला सुटी असतानाही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सुमारे 400 अधिकारी कर्मचारी "स्वच्छ भारत अभियाना'त शनिवारी सकाळी सहभागी झाले होते. या कामगारांसोबतच महिंद्रा सोना आणि अॅटलस कॉप्को कंपनीच्या कामगारांनीदेखील या मोहिमेत हिरीरिने सहभाग नोंदविला. महिंद्रा सोना कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरून या अभियानास सुरुवात करण्यात आली. यात सहभागी कामगार अधिकाऱ्यांनी बॉश कंपनीपर्यंतचे रस्ते रस्त्याच्याकडेला वाढलेले गवत काढले. संकलित कचऱ्यासाठी कंपनीने ट्रॅक्टरची व्यवस्था केली होती. सातपूर विभागातील पालिका कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा करून घंटागाडीच्या साहाय्याने खत प्रकल्पावर नेला. मोहिमेत कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, महाव्यवस्थापक सी. जी. धांडे, नासीर देशमुख, संदीप कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक सतीश गोगटे, कर्नल बॅनर्जी, कमलाकर धोंडगे, आशा सबरवाल तसेच युनियनचे अध्यक्ष योगेश चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, जनरल सेक्रेटरी सोपान शहाणे, सेक्रेटरी परशुराम कानकेकर, लॉरेन्स भंडारी, सुनील आेझरकर, भुवलेश्वर पोई आदींनी यात सहभाग घेतला होती.
मध्यवर्ती भागातही राबविणार मोहीम
स्वच्छताअभियानाला आमच्या दारापासून सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत सातत्य ठेवण्यात येणार असून, ठक्कर बझार निमाणी बसस्टँड येथेही आम्ही नियमित मोहीम राबविणार आहोत. त्याचप्रमाणे "नन्ही कली' उपक्रमांतर्गत आम्ही दत्तक घेतलेल्या 20 शाळांमध्ये हे अभियान राबवितानाच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. हिरामणआहेर, उपाध्यक्षमहिंद्रा अँड महिंद्रा, नाशिक.