आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारदर्शी कारभारच प्रदूषण घटवेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - छत्रपती शिवरायांसारखा पारदर्शी कारभार जर आज महाराष्ट्रात सध्याच्या राज्यकर्त्यांकडून राबविला गेला; तर प्रदूषणासारख्या अनेक समस्या सुटू शकतील असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ मोहन कुलकर्णी यांनी केले.

भाजप पर्यावरण मंचाच्या वतीने जागतिक पर्यावरणदिनानिमित्त आयएमए सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी पर्यावरणाच्या समस्यांपासून आपल्याला स्वत:ला वेगळे काढता येऊ शकणार नाही. साधारणपणे 1990 च्या काळात या समस्यांची तीव्रता कुणालाच ठाऊक नव्हती. प्रदूषण नियंत्रण मंडळ अस्तित्वात आहे हेदेखील कुणाला माहीत नव्हते असे सांगत कुलकर्णी यांनी गुजरातमधल्या राजकीय स्थित्यंतरामुळे वापी-अंकलेश्वरातील प्रदूषण करणारे कारखाने तिथे बंद पडून महाराष्ट्रात यायला लागले ज्यांना एकेकाळी महाराष्ट्रात परवानगी दिली जात नव्हती, हा संदर्भ देऊन पर्यावरणीय संतुलन राखण्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीची किती आवश्यकता आहे हे स्पष्ट केले. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, संघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके, सुरेश पाटील, उपमहापौर सतीश कुलकर्णी उपस्थित होते. दीपक मंडळ व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने या वेळी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ आणि ‘कचरा विनियोग’ या विषयांवर पथनाट्ये सादर करण्यात आली.

नाशिकरोडला प्रेसतर्फे वृक्षारोपण
नाशिकरोड : आयएसपी, सीएनपी व्यवस्थापन, वेल्फेअर फंड कमेटी यांच्या वतीने इनडोअर स्टेडियममध्ये महाप्रबंधक टी. आर. गौडा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कमेटीचे चेअरमन के. के. मुजूमदार, वर्क्‍स मॅनेजर सुनील तिवारी, मजदूर संघाचे पदाधिकारी राजेश टाकेकर, शिवाजी कदम, नंदू पाळदे, इरफान शेख आदी उपस्थित होते. स्वागत सतीश चंद्रमोरे यांनी केले.