आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदेसह नासर्डी, वाघाडी निर्मळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- हातात खराटे, गाडीला खोचलेले फावडे, वेळेत पोहचण्याची धडपड, चेहऱ्यावर उत्सुकतेचे भाव सळसळता उत्साह अशा वातावरणात भारावलेल्या नागरिकांनी गोदावरी, नासर्डीसह वाघाडीच्या स्वच्छतेसाठी शुक्रवारी स्वत:ला अक्षरश झोकून दिले. कपडे खराब होतील गटारीतील पाण्यामुळे आजारपण येईल, याची कोणतीही भीती बाळगता सर्वांनी एकदिलाने काम केल्यामुळे तिन्ही नद्यांची पात्रे निर्मळ झाल्याचे चित्र दिसले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील २६ प्रशासकीय विभागांनी तिन्ही प्रमुख नद्यांची स्वच्छता मोहीम घेण्याचा संकल्प सोडला. या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिक स्वयंसेवी संस्थांनाही करण्यात आले होते. लोकांना नदीपात्रात स्वच्छता करण्यासाठी विशिष्ठ ठिकाणेही निश्चित करून देण्यात आली. सोशल मीडियावरून या मोहिमेविषयी मोठ्या प्रमाणात झालेली जागृती त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे या मोहिमेची आतुरतेने वाट बघत होते. शुक्रवारी सकाळी वाजता मोहीम सुरू करण्याचा मुहूर्त ठरला. या मुहूर्तावर पोहचण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती. गाड्यांना लावलेले झाडू वा खराटे, डिक्कीजवळ बांधलेले फावडे, चेहऱ्याला मास्क, हातात ग्लोज अशा तयारीत कर्मचारी येत होते. कोणतीही पर्वा करता नदीपात्रातील प्लास्टिकच्या पिशव्या, कागद-कपटे, पाणवेली, निरूपयोगी झाडे काढली जात होती. काही कर्मचाऱ्यांनी थेट नदीपात्रात उतरून गाळही काढण्यास सुरुवात केली.
जेसीबी, रोबोटने नदीपात्र स्वच्छ
नासर्डी, वाघाडी नदीपात्रात जेसीबी रोबोट यंत्राद्वारे नदीपात्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. जेसीबीमुळे नदीपात्रातील माती वाळूही एकसंघ झाली. खासकरून नासर्डीचे पात्र विस्तृत होऊन दोन्ही किनाऱ्यावर पायी फेरफटका मारता येईल, अशी जागाही तयार झाली. गोदावरी नदीपात्र खोल असल्यामुळे जेसीबी वा रोबोटचा वापर करता आला नाही. मात्र, येथे नागरिकांनी किनाऱ्यावरील घाण वा कचरा साफ केला. रामकुंडापासून तर कन्नमवार पुलापर्यंतच्या नदीपात्रात पाणी कमी असल्यामुळे किनाऱ्याकडील गाळ, घाण निर्माल्य लोकांनी साफ केले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, महापौरही झाले सफाई कामगार...