आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cleaning Before Rain In Ambad Midc Area In Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमआयडीसी घेणार मोकळा श्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अंबड औद्योगिक वसाहतीतील नाले, रस्ते पावसाळ्यापूर्वी मोकळा श्वास घेणार आहेत. औद्योगिक वसाहतीत पावसाळ्यापूर्वीच्या कामांच्या नियोजनासाठी बुधवारी आयमा रिक्रिएशन सेंटर येथे बैठक झाली. महापालिका अधिकारी आणि उद्योजक प्रतिनिधी यांच्या या बैठकीत गुरुवारपासून औद्योगिक वसाहतीत काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कामांचे झाले नियोजन - दरवर्षी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांत पावसाचे पाणी जाऊन मोठे नुकसान होते. एचएलएफडी विभागामधील पाणी तुंबणार्‍या भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. अशा भागांत पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइपलाईन टाकण्यात येणार आहे. सर्व नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्ती, रस्त्यांची डागडुजी, वाहतूक बेटांचे नियोजन, देखभाल व सुशोभीकरण यासाठी पालिका अंदाजपत्रकात चार लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

निधीची आडकाठी नको - अधिकारी काम करण्यास उत्सुक असले, तरी विभागीय अधिकार्‍यांना केवळ 15 हजार रुपये खर्च करण्याचा अधिकार आहे. आयुक्तपदी संजय खंदारे यांनी बुधवारीच पदभार स्वीकारल्यामुळे नियोजित कामांची आर्थिक तरतूद त्वरित होईल का, पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणार का, याकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे.
बैठकीस आयमा अध्यक्ष सुरेश माळी, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा सरचिटणीस राजेंद्र अहिरे, विवेक पाटील, वरुण तलवार, निखिल पांचाल, उन्मेश कुलकर्णी, नगरसेवक उत्तम दोंदे, विभागीय अधिकारी वाघ, उपअभियंता, पठाडे, कनिष्ठ अभियंता काझी आदी उपस्थित होते.