नाशिक- हरितकुंभ संकल्पनेअंतर्गत पर्यावरण दिनी (दि. ५) करण्यात येणाऱ्या नदी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणाऱ्या संस्थांची स्थळनिहाय निश्चिती झाली आहे. गोदावरी, नासर्डी आणि वाघाडी या नद्यांसह एकूण ६९ ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येईल. विविध प्रशासकीय स्तरावर स्वयंसेवी आणि पर्यावरणप्रेमी संस्थांच्या सहकार्याने प्रथमच अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी या स्वच्छता अभियानाबद्दल तपशीलवार माहिती संस्थाच्या प्रतिनिधींना दिली.
जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या या माेहिमेचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. जूनला सकाळी ते ११ वाजेदरम्यान स्वच्छता केली जाणार आहे. सहभागी झालेल्या प्रत्येक पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्थेलाही त्यांना कुठे स्वच्छता करावयाची आहे, याची माहिती दोन दिवस आधीच मिळाली आहे. हरित कुंभच्या टीमने अपर जिल्हाधिकारी (सिंहस्थ कुंभमेळा) रघुनाथ गावडे यांच्यासोबत तीन दिवसांत हे नियोजन केले आहे. त्यामुळे आता सर्व प्रतिनिधींना कुठलीही अडचण येणार नसून, ऐनवेळी गोंधळ होण्याची काळजी घेण्यात आली आहे. नागरिकांनीही मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह यांनी केले आहे.
सफाई कर्मचारी असेल संपर्क प्रतिनिधी
महापालिकेचा सफाई कर्मचारी संपर्क प्रतिनिधी राहणार आहे. त्यामुळे त्या-त्या स्थळावर स्वच्छतेची त्यांना पूर्ण कल्पना असेल. त्या ठिकाणी घंटागाडीही राहणार आहे. त्यामुळे कचऱ्याचाही प्रश्न राहणार नाही.
वाढत्या प्रतिसादामुळे स्थळांतही वाढ
प्रथम ५३ स्थळे निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी १३१ संस्थांचे १० हजार २३२ स्वयंसेवक सहभागी हाेण्याचा अंदाज होता. आता शासकीय विभागांसह संस्थांची संख्या १३६ झाली आहे. त्यामुळे स्थळे ६९ झाली आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ‘दिव्य मराठी’चे आवाहन...