आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वापराविना शेकडो निर्माल्य कलश, ठिकठिकाणी मात्र अस्वच्छतेचा कळस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तब्बल महिनाभरापासून महापालिकेकडून शहरात स्वच्छता अभियान राबवले जात आहे. मात्र, त्याची कुठल्याही प्रकासपणे दिसून येत नाही. याची काही प्रमुख कारणे ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत समोर आ ली आ हेत. केवळ फलक लावण्यातच धन्यता, प्रत्यक्षात ब्लॅक स्पॉट्सवर कचराकुंडी नसणे, धार्मिक स्थळ, घाट परिसरात निर्माल्य कलश ठेवणे, नियमित स्वच्छता होणे यांसह सर्वात महत्त्वाचे म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनाच या मोहिमेबाबत माहिती नसणे अशा काही कारणांमुळे हे अभियान केवळ फार्स ठरत आ हे. डिसेंबर महिन्यात राबविण्यात आ लेल्या विशेष स्वच्छता अभियानाबाबतही पालिका कर्मचारी वा लोकप्रतिनिधींना मागमूसही नसल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’ने प्रकाशात आ णली होती. यानंतर महापालिका प्रशासनाने ते १५ जानेवारीदरम्यान पुन्हा जोमाने प्रबोधन अन् स्वच्छता मोहीम हाती घेतली आ हे. परंतु, तरीदेखील अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य कायम असल्याने यातही अपेक्षित यश येत नसल्याचे दिसून येते. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने लाखो रुपये खर्च करून निर्माल्य कलश विकत घेतले. मात्र, मुख्य पर्वण्यांनंतरही हे कलश पालिकेच्या दारी पडून असल्याचे दिसून आ ले आ हे. विशेष म्हणजे, पालिकेतर्फे स्वच्छता अभियान यशस्वितेसाठी ‘निर्माल्य कलश वापरा’ असे वारंवार आ वाहन केले जात आ हे. याबाबतचे फलकही शहरात लावण्यात आ ले आ हेत. मात्र, प्रत्यक्षात आ वश्यक त्या ठिकाणी निर्माल्य कलशच ठेवण्यात आ ले नसल्याने नागरिकांनी त्याचा वापर तरी कसा करायचा, हा प्रश्न पडतो. धार्मिक स्थळे, गोदाघाट परिसरात निर्माल्य कलश अत्यंत गरजेचेच असताना आ वश्यक तितक्या प्रमाणात अद्यापही ते उपलब्ध करून देण्यात आ ले नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य कायम आ हे. यामुळे परिसर स्वच्छतेचा प्रश्न तर निर्माण होतोच, परंतु नागरिक, भाविकांच्या आरोग्याचाही प्रश्न उपस्थित होत आहे.
पर्यटकांसमोर‘डर्टी सिटी’चे दर्शन
गोदाघाटावरील रामकुंड देश-विदेशातील नागरिकांचे तीर्थस्थान आहे. या ठिकाणी रोजच मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. तीन पर्वण्या संपल्या म्हणजे सिंहस्थ संपला, अशीच काहीशी भावना प्रशासनाची दिसून येत आ हे. मात्र, हा कुंभपर्व वर्षभर सुरू राहणार असल्याने रामकुंडासह सर्व धार्मिक ठिकाणी नियमित स्वच्छता, पाणी, वीज, रस्ते या सुविधा पुरविण्याची जबाबदारी प्रशासनाला पार पाडावयाची आ हे. प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसून येत नसल्याने गोदाघाटावर ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आ हे. यामुळे परराज्यातून तसेच देशभरातून येणाऱ्या भाविकांना नाशिक शहराचे ‘डर्टी सिटी’ म्हणून दर्शन घडत असल्याची चर्चाही या ठिकाणी ऐकू येते.

कलशां अभावीघाटांना बकाल रूप
सिंहस्थात प्रशासनातर्फे नव्याने सात घाट बांधण्यात आ ले. एकूण २७४० मीटर लांबीच्या या घाटांसाठी जलसंपदा विभागाने १३८.९७ कोटी रुपये खर्चही केले. मात्र, मुख्य पर्वण्यांनंतर या घाटांचीही देखभाल तसेच नियमित स्वच्छता राखली जात नसल्याने ठिकठिकाणी अस्वच्छता पसरून घाटांना बकाल स्वरूप आलेले दिसत आ हे. घाटांवर अनेक ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले नसल्याने अनेक पात्रातच कचरा टाकतात.

मुख्यपर्वण्यांनंतर स्वच्छतेकडे दुर्लक्षच
सिंहस्थात अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन स्वच्छता केली जात होती. मात्र, सिंहस्थाच्या प्रमुख पर्वण्यांनंतर गोदाघाट परिसरातील निर्माल्याच्या ढिगाऱ्यांकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षच हाेत आ हे. घंटागाडीही अनियमित असल्याने कचरा साठून दुर्गंधी पसरत आहे.

‘निर्माल्य कलश वापरा’चे आ वाहन केले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कलश नसल्याने नदीपात्रात अथवा घाट परिसरातच निर्माल्य, कचरा टाकला जात असल्याने असे चित्र आ हे.

योग्य नियोजनाची गरज
^महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेसाठी प्रभावीपणे जनजागृती करणे गरजेचे आहे. गोदाघाटासह इतर ठिकाणी महापालिका प्रशासनाने ‘स्पेशल डस्टबीन’ची संकल्पना राबवायला हवी. योग्य नियोजन केले गेल्यास मोहीम यशस्वी होऊ शकते. - डॉ. सादिक शेख

मंदिर, रामकुंड परिसरात कायमस्वरूपी कलश हवे
^पंचवटी परिसरातमोठ्या संख्येने मंदिरे आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळांच्या ठिकाणी निर्माल्य सर्वाधिक जमा होते. मात्र, तरीही अनेक ठिकाणी निर्माल्य कलशच नसल्याने भाविकांकडून रस्त्यावर अथवा पाण्यातच निर्माल्य टाकले जाते. यामुळे आ वश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी कलश ठेवण्यात यावेत. देवांग जानी, गोदावरीनागरी सेवा समिती

लाखो रुपये पाण्यात...
^महापालिका प्रशासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत विशेष मोहीम राबवली जात आ हे. यासाठी निर्माल्य कलश वापरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, लाखो रुपये खर्चून खरेदी केलेले निर्माल्य कलश धूळखात पडून असल्याने त्याचा वापर कधी अन् कसा करायचा, हा प्रश्नच आ हे. प्रशासनाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. योगेश गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ता

एकीकडे आ वाहन अन् दुसरीकडे काणाडोळा
महापालिकेच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेंतर्गत शहरात ठिकठिकाणी मोठमोठे पोस्टर्स, हॉर्डिंग्ज लावून तसेच विविध जाहिरातींद्वारे जनजागृती केली जात आ हे. नागरिकांना शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन केले जात आ हे. रस्त्यावर कचरा टाकता ताे निर्माल्य कलशातच टाकावा, असे आवाहनही केले जात आहे. मात्र, नागरिकांना कचरा टाकण्यासाठी प्रत्यक्षात ठिकठिकाणी निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्याची तत्परता प्रशासन दाखवत नसल्याने आ श्चर्य व्यक्त केले जात आ हे. शहरातील विविध चौकांत, घाट परिसरात तसेच इतर गरजेच्या ठिकाणी निर्माल्य, कचरा संकलनासाठी लाखो रुपये खर्च करून घेतलेले शेकडो निर्माल्य कलश पडून आ जघडीला पंडित कॉलनी येथील महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयात धूळखात पडून असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आ ले आहे.

धूळखात पडलेल्या महापालिकेच्या अनेक निर्माल्य कलशांची मोठ्या प्रमाणावर तूटफूट झालेली असून, या कलशांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची कबुली एका कर्मचाऱ्याने नाव छापण्याच्या अटीवर दिली. यावरून पालिका प्रशासनाचीच शहर स्वच्छतेप्रति असलेली उदासीनता अधोरेखित होते.

अपुरी संख्या, निर्माल्य रस्त्यावर
गोदाघाटावरएकाच ठिकाणी गरज नसताना तीन ते चार निर्माल्य कलश पडून आ हेत. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कलशांअभावी उघड्यावरच कचरा टाकला जात आ हे. अहिल्याबाई होळकर पुलावर ठेवलेले निर्माल्य कलशही सध्या गायब आ हेत. त्यामुळे रस्त्यावरच कचरा पडलेला दिसून येतो. काही ठिकाणी तर कचरा आ णि निर्माल्याने हे कलश
ओथंबून भरले असतानाही यातील कचरा काढण्याची तसदी स्वच्छता कर्मचारी घेत नसल्याच्या तक्रारी आ हेत. ‘निर्माल्य कलश तरी रस्त्यावर कचरा’ असे चित्रही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आ हे.

असे केले जातेय आवाहन
महापालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी हॉर्डिंग लावून नागरिकांना स्वच्छतेसाठी आवाहन केले जात आहे. यात नागरिकांनी आपल्या घर-कार्यालय परिसर, तसेच कुंपणाबाहेर, लागतच्या परिसराची नियमित स्वच्छता करावी, निर्माल्य कलश वापरावेत, कार्यालयांत शौचालय सुविधा असावी, कचरापेटीही साफ ठेवावी, कचरा जाळू नये, अशा सूचना पालिकेतर्फे केल्या जात आहेत.

३० निर्माल्य कलशांचा तुटवडा
रामकुंड गोदाघाट परिसरात कचरा संकलनासाठी ठेवलेले १५ निर्माल्य कलश अपुरे असल्याने वाट्टेल तेथे किंवा थेट गोदापात्रातच निर्माल्य, कचरा टाकला जातो. या ठिकाणी अजून किमान २५ ते ३० निर्माल्य कलशांची गरज आ हे, तरच कचऱ्याचे योग्य संकलन होऊ शकेल, अशा प्रतिक्रिया परिसरातील काही जागरूक नागरिकांनी ‘डी. बी. स्टार’कडे व्यक्त केल्या आ हेत.