आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cleaning Staff Recruitment Issue In Nashik Municipal

ठेकेदारीकरण फेटाळत राेजंदारीवरच भरती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिकमधील स्वच्छतेचा प्रश्न ठेकेदारामार्फत ७०० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून साेडविण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एकीमुळे महापाैर अशाेक मुर्तडक यांनी फेटाळतानाच यापुढे राेजंदारीवर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे अादेशही दिले.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या हालचाली सुरू हाेत्या. ठेकेदारामार्फत सिंहस्थासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचा झालेला छळ, अार्थिक हाल पाहता मानधनावर भूमिपुत्रांना महापालिका सेवेत सामावून घेण्याची मागणी होत हाेती. त्यासाठी वाल्मीकी-मेहतर-मेघवाळ समाज संघटना, वाल्मीकी नवयुवक संघटनेकडून पाठपुरावा सुरू हाेता. मात्र, प्रशासनाने सर्वांना धुडकावत महासभेत ७०० कर्मचाऱ्यांना ठेकेदारी पद्धतीने नियुक्त करण्याचा १२ काेटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला.

हा प्रस्ताव मंजूर करण्याच्या पार्श्वभूमीवर सुरत पॅटर्नची पाहणी झाली त्यात सुरत महापालिकेने १६०० कर्मचाऱ्यांचे मानधन तत्त्वावर यशस्वी पद्धतीने व्यवस्थापन केल्याचा अनुभव ‘याचि देही याचि डाेळा’ महापाैरांसह पदाधिकाऱ्यांनी घेतला.

भूमिपुत्रांना काम दिल्यास शिवसेना, माकप राष्ट्रवादीने अाक्रमक पवित्रा घेतल्याचे बघून सत्ताधारी मनसेनेही बॅकफूटवर जात प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावला. यासंदर्भात प्रस्ताव मंजुरीसाठी अाल्यावर सर्वपक्षीय नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी उभे राहून विराेध सुरू केला. ते पाहून महापाैरांनी तातडीने प्रस्ताव फेटाळून राेजंदारीवर भरतीचे अादेश िदले.

तणाव, टाळ्या अन् अातषबाजी...
ठेकेदारा मार्फतकाम देण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी असल्यामुळे सकाळपासूनच वाल्मीकी-मेहतर-मेघवाळ समाजाचे कार्यकर्ते महापालिकेत जमा झाले हाेते. अायुक्तांच्या दालनाबाहेरही महिलांनी ठिय्या मांडला हाेता. काही कार्यकर्ते ‘रामायण’ येथे उभे हाेते. त्यांच्याकडून काही अाक्रमक हालचाली झाल्या, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद‌्भवण्याच्या भीतीतून पाेलिसांना पाचारण करण्यात अाले हाेते. त्यामुळे महापालिकेला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले हाेते. दुसरीकडे, महासभेत महापाैरांनी प्रस्ताव फेटाळल्यावर गॅलरीतून कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर राजीव गांधी भवन प्रवेशद्वाराजवळ फटाक्यांची अातषबाजी झाल्यामुळे दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळीची अनुभूती अाली.


-------------------------