आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० हजारांची लाच घेताना पालिका बांधकाम विभाग लिपिकास अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेत सर्वाधिक चर्चेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागात चक्क २० हजार रुपयांची लाच घेताना वरिष्ठ लिपिक शेखर निवृत्ती कावळे याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी (दि. १४) दुपारी अटक करून भ्रष्टाचारी व्यवस्थेला चांगलाच दणका दिला. विशेष म्हणजे, बांधकाम खात्यात तब्बल १५ वर्षांपासून कावळे हे कार्यरत हाेते. अलीकडेच नाशिकराेड पाणीपुरवठा विभागात बदली झालेली असूनही दाेन्ही विभागांची सूत्रे त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्यावरील विशेष मर्जीही चर्चेचा विषय ठरली हाेती.
बांधकाम विभाग सिंहस्थकाळातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या चार दिवसांपासून वादात अाहे. गुरुवारी सकाळपासून या विभागाचे प्रमुख अधिकारी स्थायी समिती, अमरधाम दाैरा त्यानंतर महापाैरांसह खड्डे पाहणी दाैऱ्यात व्यस्त हाेते. मात्र, दुपारनंतर लाचलुचपत खात्याच्या कारवाईची माेठी बातमी अाल्यामुळे विभागाला चांगलाच हादरा बसला. अाडगाव मखमलाबादला मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाची भिंत बांधण्याचा ठेका तक्रारदाराकडे हाेता. १३ लाख रुपयांचे काम सद्यस्थितीत सुरू हाेते; मात्र तत्पूर्वी ठेकेदाराने या कामापाेटी भरलेली सुरक्षा अनामत रक्कम परत मिळण्यासाठी अर्ज केला हाेता. अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदाराने कावळे यांची भेट घेतली असता त्यांनी १३ लाख रुपयांचे काम दिले असल्यामुळे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावर तक्रारदाराने इतके पैसे अाता अापल्याकडे नसल्याचेसांगितल्यावर अाता २० हजार त्यानंतर उर्वरित रक्कम द्यावी, असे ठरले. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागात १४३ क्रमांकाच्या कक्षात कावळे यांना सायंकाळी साडेपाच वाजता पैसे घेताना पकडण्यात अाले. बांधकाम विभागात लाचलुचपत खात्याचा छापा पडल्याचे लक्षात अाल्यावर अनेकांनी तेथे गर्दी केली हाेती.

गेडामजाताच लाचखाेरी सुरू : महापालिकेतूनअलीकडेच बदलून गेलेले अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांची अाता अाठवण काढली जात असून त्यांची कठाेर भूमिका कार्यपद्धतीमुळे लाचखाेरांना माेठी जरब हाेती असेही सांगितले जात अाहे. गेडाम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काेणी पैसे मागत असेल तर थेट लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधावा असेही अावाहन केले हाेते. गेल्या अाठवड्यात त्यांची बदली झाल्यानंतर लाचखाेरांना माेकळे रान मिळाले तर नाही ना अशीही चर्चा या छाप्यानंतर सुरू झाली अाहे. एकप्रकारे नवनिर्वाचित अायुक्तांनाही हे एक माेठे अाव्हान असून खाबुगिरी राेखण्याबराेबरच प्रशासनावर पकड मिळवणे शिस्त लावण्याची कसरत करावी लागेल, अशी चर्चा पालिका वर्तुळात हाेती.

कावळेच्या निवासस्थानी झडती
लाचखाेर कर्मचारी कावळे याचा नाशिकराेड भागातील प्रतीक बंगला, शिवम कॉलनी, आर्टिलरी सेंटररोड या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासी पथकाने झडती घेतली. त्यात सुमारे ८० हजारांची रक्कम स्त्रीधन सापडले. त्याच्या वेगवेगळ्या बँकांतील खात्यांची माहिती घेण्यात येत असून, त्याचीही तपासणी केली जाणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. या पथकात वरिष्ठ निरीक्षक धोंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणी सरकारवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत कावळे यास अटक करण्यात अाली अाहे.

‘त्या’ छाप्याची झाली अनेकांना अाठवण
सहा-सातवर्षांनी महापालिकेत लाचलुचपत खात्याने टाकलेल्या छाप्यामुळे जुन्या प्रकरणांना उजाळा मिळाला. यापूर्वी नगररचना विभागातील कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, अशाेक मेश्राम यांच्यासह दाेन कर्मचाऱ्यांना पकडले हाेते. त्यानंतर महापालिका प्रशासन उपायुक्त प्रवीण देवरे यांनी कर्मचाऱ्यांकडून लाच घेतल्याचे प्रकरण समाेर अाले. यासह विभागीय अधिकारी कार्यालयात अनेक छाेटे- माेठे छापे पडले हाेते.
बातम्या आणखी आहेत...