आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरण बदलामुळे बालरुग्णांत वाढ, पाणी उकळून पिण्याचा डॉक्टरांनी दिला सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकीकडे शहरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथीच्या अाजारांत तसेच संसर्गजन्य अाजारांत माेठ्या प्रमाणात वाढ हाेत असतानाच, अाता वातावरणात सातत्याने हाेणाऱ्या बदलांमुळेही रुग्णसंख्या माेठ्या प्रमाणावर वाढू लागली अाहे. यात बालरुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. 
 
शहरातील पालिका रुग्णालयांसह काही खासगी रुग्णालयांमध्येही या अाकडा माेठा अाहे. 
लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांच्यात संसर्गजन्य अाजार लवकर बळावतात. गेल्या काही दिवसांपासून सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन अन् संध्याकाळी अचानक वाढणारी थंडी या वातावरणातील मिश्र बदलामुळे अाराेग्य धाेक्यात अाले अाहे. या बदलाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसताे. 
 
परीक्षाकाळात अाजारांचे संक्रमण : सध्यापरीक्षांचा कालावधी असतानाच संसर्गजन्य रुग्णांची वाढती संख्या धाेकादायक ठरत अाहे. पालकांनी पाल्यांना बाहेरील वा उघड्यावरील तेलकट अन्नपदार्थ खाण्यास मज्जाव करावा, पाणी उकळूनच प्यावे, असा सल्लाही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिला जात अाहे. 
 
या अाजारांचे रुग्ण 
{सर्दी {खोकला 
{हिवताप {अतिसार 
 
अशी घ्या काळजी 
पाणी उकळून प्यावे, दररोज एक तास तरी व्यायाम करावा किंवा मैदानावरचे खेळ खेळावेत, उघड्यावरील वा तेलकट पदार्थांपेक्षा प्रथिने, व्हिटॅमिनयुक्त पदार्थ खावेत, हळदीचे दूध प्यावे, जास्तीत जास्त फळे खावीत, वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. 
 
योग्य औषधोपचार घ्या 
वातावरणात हाेत असलेल्या अचानक बदलामुळे लहान मुलांमध्ये संसर्गजन्य अाजार बळावत आहेत. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषधोपचार घ्यावेत -डॉ. नितीन मेहकर, बालराेगतज्ज्ञ. 
बातम्या आणखी आहेत...