आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांना एसआरएमध्ये 269 ऐवजी 305 स्क्वेअर फुटांची घरे, मुख्यमंत्र्यांची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत  झोपडपट्ट्यांमध्ये  राहणारे लाखो लोक अतिशय बिकट अवस्थेत जगत आहेत. अशा गरीब मुंबईकरांचे  जीवन सुसह्य करण्यासाठी एसआरए योजनेत त्यांना यापुढे २६९ ऐवजी ३०५ स्क्वेअर फुटांची घरे दिली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केली.  

शीव चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर मुंबई महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या प्रचार सभेत बोलताना फडणवीस यांनी गरीब मुंबईकरांना  इमारतीतील मोठ्या घराचे स्वप्न दाखवले. एसआरए योजनेत प्रचंड घोटाळा होता. तो आता बंद झाला असून एसआरए ही योजना यापुढे बिल्डरांसाठी नसून गरिबांसाठी असेल, हा भाजपचा तुम्हाला दिलेला शब्द आहे.
 
यामुळेच  आता त्यांना यापुढे ५० स्क्वेअर फुटांचे वाढीव घर दिले जाईल. याच वेळी विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवर ५० हजार घरे झोपडपट्टीवासीयांसाठी तयार केली जाणार आहे. त्याचबरोबर वनजमिनीवरही घरे बांधून देण्याचा आमचे  सरकार विचार करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.    
 
भाजप पालिकेच्या जिवावर  नाही : अामचा भाजप पक्ष हा महानगरपालिकेच्या जिवावर चालत नाही आणि सत्ता आल्यास चालवणार नाही. आमची पारदर्शकतेची भूमिका स्पष्ट असल्याने त्यांनी युती तोडली. प्रचार सभांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कव्हर फायरिंग केल्यासारखी भाषणे करत सुटले आहेत.
 
मुंबई महापालिकेत रस्ते, कचरा, गाळ यांच्यात  प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने उद्धव बोलणार तरी काय, अशी परिस्थिती आहे. यामुळे मोदी, राममंदिर, सर्जिकल स्ट्राइक यावर बोलत असून त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत, असेही ते म्हणाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...