आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभाराची दोन वर्षे: रोजगार नसलेली ‘कागदी’ गुंतवणूक; अव्यवहार्य ‘समृद्ध’ महामार्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या सरकारला येत्या ३० ऑक्टोबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. सरकारने गेल्या २३ महिन्यांत १०१ बैठका घेतल्या १५,१७६ जीआर काढले.

सत्तेला दोन वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने सत्ताधारी पक्ष आता आपल्या कामगिरीचे गोडवे गाईल, तर विरोधक सरकार कसे अपयशी ठरले यावर टीका करेल. ‘दिव्य मराठी’ने सरकारचे दावे आणि वस्तुस्थिती यानिमित्ताने वाचकांसमोर ठेवली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना हे सरकार जाहिरातबाज प्रभावशून्य असल्याची टीका केली. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पारदर्शी कारभार आणि स्वच्छ प्रतिमा असल्याने हे सरकार जनतेला आपले वाटते. त्यामुळे सरकारने जनतेचा विश्वास मिळवला आहे, असे ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
पुढील स्लाइडवर वाचा, जाहिरातबाज, प्रभावशून्य सरकार माजी मुख्यमंत्री चव्हाणांची टीका
बातम्या आणखी आहेत...