आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा आमचा नाही, साधू-महंतांचा सोहळा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ-कुंभमेळा हा आमचा अर्थात शासकीय सोहळाच नाही. ताे केवळ साधू-महंतांचा सोहळा आहे. आम्ही फक्त त्यासाठी सोयी-सुविधाच पुरवत असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशिक दौर्‍यात साधू-महंतांची नाराजी दूर करण्याऐवजी ताठर भूमिका घेतली. त्यामुळे या आयाेजनापासून सरकार अलिप्त राहते की काय, अशी चर्चा सुरू झाली. अर्थात, त्यांनी आमचे मंत्री साधूंच्या सहभागासाठी पुढाकार घेतील. िसंहस्थ यशस्वीपणे पार पडेल, असा िवश्वासही व्यक्त केला.

सिंहस्थाची कामे करण्यावर प्रशासन भर देतेय, परंतु आखाड्यांसाठी अपेक्षित सुविधा दिल्या नसल्याने काही साधू-महंतांनी थेट कुंभमेळ्यावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा िदला आहे. त्यामुळे नाशिक दौर्‍यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरचा पाहणी दौरा करण्याच्या मन:स्थितीत होते, परंतु साधूंनी त्यांना न भेटण्याची भूमिका घेतल्याचे समजताच त्यांनी ऐनवेळी हा दौरा रद्द केल्याची चर्चा होती. त्याबाबत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट कुंभमेळा आमचा सोहळा नाही. तो साधू-महंतांचाच आहे. त्यामुळे तो कसा साजरा करावयाचा हा त्यांचाच निर्णय आहे. घरच्या सत्यनारायण पूजेवर कोणी बहिष्कार टाकत नसल्याचे सांगत, सिंहस्थात सहभागी व्हावयाचे की नाही हा निर्णय साधू-महंतांवरच त्यांनी ढकलला.

सरकारचे सोयी -सुविधा देण्याचे काम असून ते योग्यपणे केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्य शासनाने या सोहळ्यातून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले आहे की काय, असेच चित्र निर्माण झाले. त्याचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर फडणवीस यांनी आमचे सिंहस्थाची जबाबदारी असलेले मंत्री साधूंच्या त्यातील सहभागासाठी पुढाकार घेतील, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्याबराेबरच सिंहस्थ यशस्वी पार पाडण्याचा विश्वास व्यक्त करण्यासही ते िवसरले नाहीत.

पंकजा मुंडे प्रकरणावर मौन
विनानिविदा देण्यात आलेल्या २०६ कोटी रुपयांच्या कंत्राटामध्ये ग्रामविकासमंत्री पंकजा पालवे- मुंडे यांनी भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशकात मौन पाळले. विशेष म्हणजे ही नकारात्मक बातमी देण्याऐवजी तुम्ही आता गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला विजेचा दर कमी करण्याचा िनर्णय घेण्यात आला आहे. भाजप सरकारचा हा उत्तम निर्णय असून त्याला पत्रकारांनी हेडलाइन करावी, असे मिश्कीलपणे सुचवले. मुंडेंप्रकरणी वेळ आल्यास नक्कीच बोलेन, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...