आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Fadanvis Visit Hailstorm Affected Area In Nashik

नाशिक : गारपीटग्रस्त शेतक-यांचा मुख्यमंत्र्यांसमोर संताप, लवकरच पॅकेज देणार सीएमचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिक येथील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. गेल्या दोन दिवसांत गारपीटीमुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिंडोरी येथील द्राक्षांच्या बागांची पाहणी केली. यावेळी फडणवीस यांनी गारपीट ग्रस्‍तांसाठी विधिमंडळात निवेदन करणार असल्‍याचे आश्वासन दिले.

दिंडोरीनंतर मुख्यमंत्री तळेगाव, सोनजांब, तिसगाव या गावांतील द्राक्ष बागांचीही पाहणी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. फडणवीस यांच्या दौ-यादरम्यान शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी चिंताग्रस्त असलेल्या शेतक-यांनी आपल्या समस्यांचे पाढेच फडणवीसांसमोर वाचले. तर फडणवीस यांनीही शेतक-यांना आश्वासने देत त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांनी कर्जवसुली आणि थकलेल्या वीजबिलांची वसुली थांबवण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत. विधिमंडळ अधिवेशनात लवकरात लवकर गारपीटग्रस्त शेक-यांसाठी पॅकेज जाहीर करण्यासाठी निवेदन करणार असल्‍याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांतील नैसर्गिक संकटाबाबत सरकारला जाणीव असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी शेतक-यांना सांगितले. त्याबरोबरच विम्याच्या माध्यमातून पूर्णपणे नुकसान भरपाई मिळत नसल्याची वस्तुस्थितीही माहिती असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बचावासाठीच्या तंत्रज्ञानाची माहिती घेणार
दरम्यान, गारपीटीमुळे होणारे शेतक-यांचे नुकसान पाहता अशा गारपीटीपासून बचाव करण्यासाठी एखाद्या तंत्रज्ञानाची मदत घेता येईल का याबाबत चर्चा करणार असल्याचे आश्वासनही फडणवीस यांनी दिले आहे. तसेच याबाबत केंद्राशी चर्चा करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.