आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्र्यांचे झाले ‘आेझे’; हेलिकाॅप्टरच उडेना, नाशिकमध्ये पायलटची भंबेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राजकीय नेत्यांचे, त्यातही मंत्र्यांचे शासन दरबारी ‘वजन’ काही आैरच असते. त्यांच्या ‘वजनदार’पणामुळे काेणतेही अवघड काम अगदी सहज हाेऊ शकते. मात्र हे ‘वजन’च अडथळा ठरल्याचा अनुभव मुख्यमंत्र्यांसह चार मंत्र्यांना शुक्रवारी घ्यावा लागला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी नाशकात हाेते. कार्यक्रम आटाेपून हे मंत्री प्रदेश भाजपच्या बैठकीसाठी काेल्हापूरकडे निघाले. चार मंत्री व सचिव दराडे बसल्यानंतर दुपारी तीन वाजता हेलिकाॅप्टरने उड्डाण घेतले. काही उंचीवर जाताच ते अपेक्षित वेगाने वर जात नसल्याचे पायलटच्या लक्षात आले. तांत्रिक बिघाडाच्या शंकेने त्याने लँड केले व पुन्हा उड्डाणाचा प्रयत्न केला. मात्र, ताेच अनुभव आला. मग क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने हेलिकाॅप्टर उडत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. काेणाला उतरवावे, असा प्रश्न त्याला पडला. मात्र, नाइलाजाने त्याने खरी अडचण मुख्यमंत्र्यांना सांगितली. अखेर महाजन व दराडे उतरले व हेलिकाॅप्टर उडाले.
बातम्या आणखी आहेत...