आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाली नसलेल्या नाशिकला अाजपासून मी दत्तक घेताे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक शहराचा विकास रखडला अाहे. कारण या शहराकडे कुणी बघायला तयार नाही, कुणी नेताही नाही अशी येथील तमाम मतदार नागरिकांची अाेरड अाहे. यापुढे मात्र अशी वेळ नाशिककरांवर येणार नाही. कारण वाली नसलेल्या नाशिकला अाजपासून मीच दत्तक घेताेय, अशी घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. 

महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते पुढे म्हणाले की, नागपूरला दत्तक घेण्यासाठी नितीन गडकरी समर्थ अाहेत. अाता नाशिककरांनी महापालिकेची एकहाती सत्ता दिल्यास पाच वर्षांत शहराचा चेहरामाेहरा नाही बदलला तर या शहराला पुन्हा ताेंड दाखविणार नाही, असे भावनिक अावाहनही मुख्यमंत्र्यांनी या प्रचारसभेत केले. 

नाशिकचा विकास रखडला, या शहराकडे कुणी बघायला तयार नाही, कुणी नेताही नाही अशी नाशिककरांची अाेरड असली तरी यापुढे अशी वेळ येणार नाही. कारण वाली नसलेल्या नाशिकला अाजपासून मीच दत्तक घेताेय, अशी घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत केली. सर्व काही नागपूरला नेल्याचा अाराेप माझ्यावर केला जाताेय. मात्र, नागपूरला दत्तक घेण्यासाठी नितीन गडकरी समर्थ अाहेत. 
 
नाशिककरांनी महापालिकेची एकहाती सत्ता दिल्यास पाच वर्षांत नाशिकचा चेहरामाेहरा नाही बदलला तर या शहराला पुन्हा ताेंड दाखविणार नाही, असे भावनिक अावाहनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. 

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शनिवारी (दि. १८) झालेल्या जाहीर सभेत फडणवीस बाेलत हाेते. सभेच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या विकासाचे माॅडेल दाखवित केलेल्या टीकेचा फडणवीस यांनी समाचार घेतला. देश बदलताेय, महाराष्ट्र बदलताेय, अाता नाशिकही बदलायला हवे. लाेकसभा, विधानसभा अाणि नगरपालिकांमध्ये भाजपवर विश्वास दाखविला, त्याप्रमाणेच महापालिका निवडणुकीत केवळ विकास अाणि विकासाच्या मुद्यावरच एकहाती सत्ता देऊन बघा, तंगड्यात तंगडे नकाे, असे अावाहन फडणवीस यांनी केले.

 झाेपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी पालकमंत्री अाणि तीनही अामदारांनी माझ्याकडे गरिबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी पाहिजे तेवढ्या घरांची मागणी करा, ते हमखास पंतप्रधान अावास याेजनेंतर्गत उपलब्ध करून देऊ. यासाठी केंद्र सरकारने २०२२ चे उद्दिष्ट दिले असले तरी ते अापण २०१९ पर्यंत पूर्ण करून दाखवू. हे घर देताना काेणाचीही जात, पंथ, धर्म, भाषा बघता केवळ ताे गरीब अाणि बेघर असेल हेच बघणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. याचवेळी यापूर्वीच्या इंदिरा अावास याेजनेवर टिप्पणी करताना शहरात दहा-दहा घरे मिळायची, त्यात पाच घरे कुणाचे तरी ताेंड बघून दिली जायची अाणि उर्वरित पाच खिशात जायची, असा टाेलाही त्यांनी लगावला. रोजगार उद्योग विस्तारासाठी महिंद्रा कंपनीचा १५०० कोटींचा प्रकल्प राज्य सरकारने मंजूर करून आणल्याचेही ते म्हणाले. 

‘आम्ही पैसे दिले, तुम्हाला खर्च करता आले नाहीत’ 
सिंहस्थासाठी आम्ही पैसे दिले की नाही, दिले हे आधी राज ठाकरेंनी ठरवावे. पैसे दिले नाहीत म्हणून राज यांनी स्वत: फोन करून महापालिकेकडे पैसे नाहीत. केंद्र आणि राज्य शासनाकडून पैसे द्या. त्यावर आम्ही पैसेही दिले. माझा आकडा चुकत नाही. २२०० कोटींपेक्षा अधिक पैसे दिले. पण तुम्हाला ते खर्च करता आले नाही. हे तुमचे दुर्दैव. 

ते स्वत:ही नाशकात अाले असते. 
- सत्ता नसताना कुसुमाग्रज उद्यानासाठी अांदाेलन करणाऱ्या मनसेने सत्ताकाळात या उद्यानाकडे का दुर्लक्ष केले? 
- शहरातील गरिबांचे पुनर्वसन अाणि मूलभूत सुविधांकडे मनसेने दुर्लक्ष करून इतर गाेष्टींतच अधिक रस दाखविला. 
- शेतकऱ्यांची इतकी कणव अाहे तर उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण भागात एकही सभा का घेतली नाही? 
- माेठे बजेट असते, तेथेच सभा घेतली. कमी बजेट असणाऱ्या ठिकाणी उद्धव जातच नाहीत. 
- माेफत अाराेग्य सुविधा देण्याची घाेषणा करणाऱ्या उद्धव ठाकरेंची गाडी लेट झाली. पालकमंत्र्यांनी महाआरोग्य शिबिर घेऊन ही गाडी पुढे नेली. 

मुख्यमंत्र्यांचे बँकिंग
- मतदानही गुंतवणूक अाहे. ती चांगल्या बँकेत केली तर चांगल्या व्याजासह त्याचा परतावा मिळताे. 
- उद्धव ठाकरेंची लेना बँक अाहे. ती देना बँक अजिबातच नाही. 
- राष्ट्रवादीची बँक यापूर्वीच बंद करून ठेवलीय. 
- राज ठाकरे यांचे हेड अाॅफिस कृष्णकुंजच अाहे. अामची काेठेही शाखा नाही. 
- भाजप विकासाची बँक अाहे. त्यात गुंतवणूक केल्यास विकासाचे व्याज मुद्दलसह देऊ. 

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणारच 
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, मगच अाम्ही सरकारला पाठिंबा देऊ अशी अट गुरुवारी (दि. १६) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभेत टाकली हाेती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही. पण २००९ साली कर्जमाफी केल्यानंतरही अात्महत्यांचे प्रमाण वाढले हाेते. त्यामुळे अाम्ही सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सक्षम करू अाणि त्यानंतर कर्जमाफी देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. 

छाेट्या जागांना टीडीअार, कपाटाचा मुद्दाही मार्गी लावणार 
व्हायरलझालेली विकास नियंत्रण नियमावली खाेटी असेल तर खरी नियमावली तुम्ही सभेत जाहीर करा, असे अाव्हान राज ठाकरे यांनी शुक्रवारच्या (दि. १७) सभेत मुख्यमंत्र्यांना दिले हाेते. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेना अाणि मनसेने कपाेलकल्पित विकास नियंत्रण नियमावली (डीसीपीअार) अाणली अाणि ती साेशल मीडियावर व्हायरल केली. ही नियमावली पूर्णत: खाेटी अाहे. नियमावलीत अाम्ही छाेट्या रस्त्यांवरील घरांना अाणि जागांना टीडीअार देण्याची महत्त्वपूर्ण तरतूद केली अाहे. त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला कपाटांचा मुद्दाही मार्गी लावला जाईल, असे ठाेस अाश्वासन त्यांनी दिले. 

राज-उद्धव यांना टाेले 
- निवडणुकीनंतर राज ठाकरे यांच्याकडे नकला करण्याव्यतिरिक्त काेणतेही काम उरणार नाही. 
- त्यांच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा बंद झाल्या असून, गणेशाेत्सवानिमित्त तरी त्यांना नकला करायला बाेलवावे. 
- भुजबळांची नक्कल करून त्यांनी गेली निवडणूक जिंकली अाणि पाचही वर्षे नक्कलच करीत राहिले, कामे मात्र नाही. 
- राज ठाकरे कल्पक अाहेत, पण ते अापल्या कल्पनाशक्तीचा उपयाेग चुकीच्या ठिकाणी करतात. 
- टाटांना नाशिकमध्ये अाणण्यासाठी राज यांची काय गरज हाेती. उर्वरित. पान 

नाशिकसाठी अाश्वासने 
- रामदेवबाबांशी पाठपुरावा करून नाशिकमध्ये लवकरच पतंजलीचा फूडपार्क. 
- कांदा निर्यातबंदी हाेणार नाही यासाठी केंद्रात पाठपुरावा केल्याने येथून पुढे निर्यातबंदी हाेणार नाही. 
- नाशिकचे विमानतळ नियमित सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू. 
 
पुढील स्लाइडर पाहा सभेला जमलेली गर्दी....
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...