आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थाच्या कामांना निवडणुकीमुळे ‘ब्रेक’;बहुतांश यंत्रणा कामात गुंतल्याने कामे थंडावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दहा महिन्यांवर येऊन ठेपला असून, कामे वेगाने करण्याचा दबाव प्रशानावर असतानाच, आता बहुतांश अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामांत गुंतल्याने सुरू असलेली कामेही काही प्रमाणात थंडावली आहेत. त्यामुळे आता २६ तारखेनंतरच कामांना मुहूर्त लागण्याची शक्यता वाढली आहे.
१५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कर्मचारी-अधिकारीही काही प्रमाणात या कामातून मोकळे होऊ शकतील. मात्र, लागलीच दिवाळीच्या सुट्या सुरू होणार असल्याने २६ तारखेनंतरच म्हणजे पुन्हा एक हप्त्याचा विलंब लागण्याची शक्यताही वाढली आहे. शिवाय, अगदी सुट्या संपताच या महिन्याचे उरलेले चार दिवसही त्यातच जाण्याचीही शक्याता नाकारता येत नाही. त्यामुळे पुन्हा वेळेत नोकरीवर हजर होत कामे सुरू होण्यास नोव्हेंबरच उजाडणार असल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याने आता निविदा स्तरावरील रखडलेली कामे सुरू होण्यासही विलंब होण्याची शक्यता वाढली आहे.
साधुग्रामचे जागा हस्तांतरही लांबणार
दुसरीकडेसाधुग्रामसाठी शेतकऱ्यांची ऑक्टोबरला जरी जिल्हाधिकारी बैठक घेणार असले, तरीही आचारसंहितेच्या कालावधीत त्यावर निर्णय होणे शक्य नाही. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये साधुग्रामसाठी अधिग्रहित करण्यात आलेली जागा हस्तांरित करण्याचे शासनाचेच आदेश असताना त्यास विलंब होण्याची शक्यताही दिसून येत आहे.