आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाचारसंहिता शिथिल अन‌् सुटकेचा नि:श्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी जारी अाचारसंहिता महापालिका क्षेत्राला लागू झाल्यानंतर हजाराे काेटींची कामे ४० दिवस ठप्प हाेण्याच्या उभ्या राहिलेल्या संकटातून सुटका झाल्यामुळे पालिका प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास साेडला. मंगळवारी महापालिकेसाठी लागू झालेली अाचारसंहिता बुधवारी दुपारनंतर शिथिल झाल्यामुळे अाता महापालिकेच्या नियमित कामकाजाचा मार्ग माेकळा झाला अाहे.
मंगळवारी दुपारी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रासाठी अाचारसंहिता लागू झाली. त्यामुळे पालिकेच्या ताेंडचे पाणीच पळाले. २७६ काेटींच्या घंटागाडी ठेक्याचा कार्यारंभ अादेश देणे त्यामुळे मुश्कील झाले हाेते. खत प्रकल्पाचाही ठेका चालवण्यासाठी देण्याकरिता अंतिम टप्पा सुरू असताना अाचारसंहितेचे निर्बंध अाल्यामुळे पालिकेला घामच फुटला. शहरातील बांधकाम परवानगीवर राष्ट्रीय हरित लवादाचे निर्बंध असण्यामागे खत प्रकल्पाची दुरवस्था असल्याचे कारण हाेते. त्यामुळे खत प्रकल्प सुरू झाल्याशिवाय निर्बंध उठणार नव्हते. या पार्श्वभूमीवर खत प्रकल्पाचे कामकाज ठप्प हाेणार असल्यामुळे पालिकेला दूरगामी उत्पन्न विकासावर परिणाम हाेण्याची भीती हाेती. केवळ हेच नाही तर १९२ काेटींचे रस्ते, नगरसेवक विकास निधीचे ६४ काेटी, वृक्षलागवड अाणि वृक्षगणना, मिळकत सर्वेक्षण, बांधकाम परवानगी अाॅनलाइन, सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्मार्ट सिटीसारख्या याेजनेसाठी एजन्सी नेमण्याचेही काम रेंगाळणार हाेते.

महापालिका निवडणूक सहा महिन्यांवर असल्यामुळे नगरसेवकांची कामेही अडचणीत सापडणार हाेती. त्यामुळे अाचारसंहितेला सर्वपक्षीयविराेध सुरू झाला हाेता. अामदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निवडणूक अायाेगाला पत्र दिले हाेते. महापाैर अशाेक मुर्तडक जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी निवडणूक अायाेगाला पत्र देत अाचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हाेणाऱ्या काेंडीकडे लक्ष वेधले हाेते. दरम्यान, सायंकाळी अाचारसंहिता शिथील झाल्याचे वृत्त कळल्यामुळे महापालिका प्रशासन लाेकप्रतिनिधींना हायसे वाटले.

वैद्यकीय भरतीचा मार्ग माेकळा
राष्ट्रीय अाराेग्य अभियानांतर्गत वैद्यकीय विभागात डाॅक्टरपासून तर परिचारिकांपर्यंत जवळपास ७० पदांची भरतीही थांबल्याबाबत महापालिकेने नाेटीस काढली हाेती. अाता अाचारसंहिता शिथिल झाल्यामुळे भरतीचा मार्ग माेकळा हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...