आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता पालिकेचा ४० दिवस चक्काजाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतमाेजणीपर्यंतच्या ४० दिवसांसाठी महापालिका क्षेत्रात अाचारसंहिता लागू झाल्यामुळे अधिकाऱ्यांचे दुपारनंतर ताेंडचे पाणीच पळाले. घंटागाडी, खत प्रकल्पापासून थेट स्मार्ट सिटीपर्यंत काेट्यवधी रुपयांच्या कामांना ब्रेक लागणार असल्यामुळे अाता काेठे काेंडीतून सुटका हाेऊन विकासकामे मार्गी लागण्याचे चित्रही दुभंगलेही अाहे.
महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर असल्याने अाधीच नगरसेवकांबराेबरच अधिकाऱ्यांची महत्त्वाची कामे मार्गी लावण्यासाठी धडपड सुरू हाेती. मध्यंतरी विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अाचारसंहितेचे सावट हाेते. मात्र, नव्याने मतदार नाेंदणी करण्याचे अादेश दिल्यामुळे ही निवडणूक काही काळ लांबणीवर पडल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास साेडला हाेता. मात्र, सहा नगरपालिका निवडणुकीच्यानिमित्ताने महापालिका क्षेत्रातही अाचारसंहिता लागू झाल्याची बातमी पसरताच महापालिकेत धावपळ उडाली. अाचारसंहितेमुळे महापालिकेत अाता नवीन कामांना मंजुरी मिळणार नाही. महासभा, स्थायी प्रभाग समिती सभेत नवीन विषय मंजुरी, निविदा मंजुरी करता येणार नाही. अधिकाऱ्यांना निविदा काढता येणार नाही. काढलेल्या निविदा उघडता येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एखाद्या कामासाठी निविदा प्रक्रिया निश्चित हाेऊन ठेकेदारही अंतिम झाला असला तरी कार्यारंभ अादेश देता येणार नाही. २८ नाेव्हेंबरला नगरपालिका निवडणुकीची मतमाेजणी असून, त्यानंतर अाचारसंहिता शिथिल हाेईल.

बांधकाम परवानगीला ब्रेक : अाचारसंहितेचामाेठा फटका बांधकाम क्षेत्राला बसणार अाहे. खत प्रकल्पाचा कार्यारंभ अादेश दिल्यास हरित लवादाकडे पुनर्विलाेकनासाठी याचिका दाखल करता येणार नाही. परिणामी, लवादाच्या खत प्रकल्पाच्या अनुषंगाने बांधकाम परवानगीवरील निर्बंध उठणार नाही. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीसाठी नाशिक महापालिका कंपनी स्थापन झाली असून, प्रत्यक्ष कामासाठी एजन्सी नेमण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार अाहे. या कामासाठी
अाचारसंहितेमुळे निविदा काढण्यावर निर्बंध अाहेत. सहामहिने जाणार : महापालिकानिवडणूक फेब्रुवारीत हाेण्याची शक्यता अाहे. त्यामुळे हातात सहा महिने असून, नगरपालिका निवडणुकीसाठी ४० दिवस त्यानंतर पदवीधर निवडणुकीसाठी दीड महिने जातील. म्हणजेच नगरपालिकेची अाचारसंहिता नाेव्हेंबरअखेरीस संपत नाही ताेच डिसेंबरमध्ये पदवीधरची अाचारसंहिता लागेल. ही अाचारसंहिता ९० दिवस लागू असताना त्यात पालिकेची अाचारसंहिता लागेल. त्यामुळे जवळपास सर्वच महत्त्वाच्या कामांना ब्रेक लागण्याची भीती अाहे.

{ २७६ काेटींची घंटागाडी
{ १५ हजार वृक्ष लागवड वृक्षगणना रखडणार
{ मिळकत सर्वेक्षणही बासनात
{ १९२ काेटी रुपयांचे रस्ते
{ बांधकाम परवानगी अाॅनलाइनला ब्रेक
{ दाेनशेहून अधिक उद्यानांची खासगीकरणातून देखभाल
{ ३० वर्षांचा खत प्रकल्प ठेका
बातम्या आणखी आहेत...