आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात थंडीचा कडाका; आणखी दोन दिवस राहणार ढगाळ वातावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- उत्तर भारतातून पश्चिम भारताकडे वाहणार्‍या वार्‍यांमुळे आणि दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शनिवारी शहरात बेमोसमी पाऊस पडला. सुमारे 1.1 मिलिमीटर पाऊस झाला. शुक्रवारपासून दिवसभर नाशिक शहरासह जिल्ह्यात गारवा पसरला असून, नाशिक शहरात 9.9 तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 8.8 अंश सेल्सियस तपमानाची नोंद झाल्याची माहिती वेधशाळेतील सूत्रांनी दिली आहे.

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून शनिवारी दुपारी पाऊस सुरू झाला. सुमारे दीड ते दोन तास रिमझिम पाऊस सुरू होता. काश्मीरकडून वाहणार्‍या वार्‍यांचा वेग हा प्रतितास चार किलोमीटर असल्याने वातावरणात गारवा वाढला होता. शहरात दिवसभर गारवा जाणवत असल्याने नागरिकांनी उबदार कपडे परिधान केल्याचे दिसून येत होते, तर कपाटात ठेवलेल्या छत्र्या पावसापासून बचाव करण्यासाठी बाहेर काढण्यात आल्या. पावसापासून बचाव करण्यासाठी महिला आणि लहान मुलांच्या हातात छत्र्या दिसून येत होत्या. कमाल आणि किमान तापमानात सातत्याने बदल होत असल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

ढगाळ वातावरण आणखी दोन दिवस
अरब राष्ट्रांत वातावरणातील बदल आणि उत्तरेकडील वाहणार्‍या वार्‍यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण दोन दिवस राहण्याचा अंदाज आहे.