आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीने नाशिककरांना भरली हुडहुडी, किमान 9.7

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक शहरात रविवारी (दि. 17) 9.7 अंश सेल्सिअस किमान तपमानाची नोंद झाली आहे. या हंगामातील नाशिकचे आतापर्यंतचे हे सर्वात कमी तपमान असल्याने शहरवासीयांना थंडीने चांगली हुडहुडी भरली आहे.

बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य भागावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र तामिळनाडू किनारपट्टीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे त्याची तीव्रता कमी झाली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र आता लक्षद्विप आणि केरळकडे सरकले आहे. यामुळे महाराष्ट्रातील हवामान कोरडे झाले असून, त्यामुळे थंडीचा कडाका वाढत आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत किंचितशी थंडी लांबली असली तरी ती पडण्यास सुरुवात झाली आहे. या हंगामात प्रथमच पारा 9.7 म्हणजे 10 अंशांच्या खाली गेला आहे. कमाल तपमानही 28.7 अंश सेल्सिअस असल्याने दुपारी काही प्रमाणात गारवा होता. वार्‍याचा वेग प्रतितास चार किलोमीटर असल्याने थंडीची झुळूक जाणवत होती.

शहरातील आतापर्यंतचे किमान तपमान
22 आणि 23 नोव्हेंबर 2001 8.0
28 जानेवारी 2002 5.0
6 जानेवारी 2003 8.0
19 जानेवारी 2005 6.0
26 जानेवारी 2006 6.6
8 फेब्रुवारी 2008 3.5
7 जानेवारी 2011 4.4
9 फेब्रुवारी 2012 2.7