आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरावर धुक्याची दुलई; थंडीचा कडाका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक शहर आणि ग्रामीण भागात या आठवडाभरात किमान आणि कमाल तपमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे, तर अधूनमधून पसरणाऱ्या धुक्यामुळे शहरात सकाळच्या सुमारास रमणीय वातावरण तयार हाेत अाहे. रविवारी वातावरणात गारवा कायम असला तरी किमान आणि कमाल तपमानात अंशत: वाढ झाली आहे. किमान ८.५, कमाल ३१.० अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली.

लालसर उगवता सूर्य... सर्वत्र पसरलेले दाट धुके... पक्ष्यांचा होणारा किलबिलाट... झाडांच्या फांद्यांमधून रस्त्यावर पडणारी कोवळी किरणे... या धुंद वातावरणात मॉर्निंग वॉक करणारे नागरिक आणि अंगावर घेतलेले उबदार कपडे... तर स्वेटर आणि कानटोपी परिधान करून बसची प्रतीक्षा करणारे विद्यार्थी.... हे काही एखादे चित्र किंवा चित्रपटातील दृश्य नाही, तर सध्याच्या कडाक्याच्या थंडीमुळे शहरातील दृश्य आहे. या वातावरणाचा अानंद घेत शहरवासीय अापल्या कुुटुंबीयांसह सुटीच्या दिवशी पांडवलेणी, तपोवन आणि रामकुंड परिसरात फेरफटका मारताना दिसत आहेत.

पाच ते सहा दिवसांपासून उत्तर भारतात थंडीचा वाढलेला कडाका आणि त्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगात वाढ झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील तपमानात घट झाली होती. त्यामुळे नाशिक आणि निफाड परिसरात या हंगामातील नीचांकी तपमानाची नोंद झाली आहे. तर, येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असे वातावरण राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.

नाशिक शहरात रविवारी वातावरणात काही प्रमाणात तपमानात वाढ झाल्याने दुपारी थंडीची तीव्रता कमी जाणवत होती. मात्र, सकाळी तर तपमान वाढूनदेखील कडाका जाणवत असल्याने नागरिक आनंद घेताना दिसत होते.