आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पुन्हा थंडीचा कडाका, किमान तपमान अंश घटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक शहरातील हवामान कोरडे झाले असून, अंशत: ढगाळ होते. या संमिश्र वातावरणामुळे किमान तपमानात घट, तर कमाल तपमानात वाढ झाली आहे. मंगळवारी किमान ११.७, तर कमाल २७.० अंश सेल्सिअस तपमानांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे शहरात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे.

किमान तपमानात अंश सेल्सिअसने घट झाल्याने सकाळी वातावरणात गारवा जाणवत होता. तर, कमाल तपमानात वाढ असल्याने दुपारी उकाडा जाणवत होता. हवामान विभागाने बुधवारी आकाश कोरडे राहणार असून, अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. राज्यात मंगळवारी नाशिकचे किमान तपमान नीचांकी नोंदविले गेले. त्याखालोखाल चंद्रपूर ११.८, नांदेड १२.५, नगर १३.२, तर मालेगाव १४.८ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती.