नाशिक - सलगतीन दिवसांपासून पारा सहा-सात अंशांच्या आसपास रेंगाळत असल्याने नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. बुधवारीही किमान तपमान ६.६ अंश सेल्सिअस असल्याने दिवसभर गारवा होता. अधूनमधून वाऱ्याचा वेग कमी-जास्त होत असल्याने थंडीचा कडाका जास्तच जाणवत होता.
सोमवारपासून उत्तर भारतात
हिमवृष्टी होत आहे. तसेच, उत्तरेकडील वारे वाहत असल्याने उत्तर महाराष्ट्रात तपमान कमालीचे उतरले आहे. सोमवारी ६.४, मंगळवारी ७.२ आणि बुधवारी ६.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली. तपमानात घट झाल्यामुळे सकाळी धुके पडत आहे. आणखी आठवडाभर असेच तपमान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
थंडीमुळे सकाळी लवकर सुरू होणाऱ्या शाळांमधील मुलांच्या उपस्थितीवर परिणाम झाला आहे.