आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांनी पुन्हा वाढणार थंडीचा कडाका; ओखी चक्रीवादळ शमले, दोन दिवसांनी सूर्यदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- ओखी चक्रीवादळ निर्माण झाल्याने तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाने थैमान घातले होते. मात्र, अाता चक्रीवादळ शमल्याने वातावरण पूर्वपदावर येत आहे. गुरुवारी ढगाळ वातावरण असले तरी सूर्याचे दर्शन झाल्याने नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. मात्र, वातावरण पूर्वपदावर येणार असल्याने दोन दिवसांनंतर थंडीचा कडाका पुन्हा जाणवणार आहे. बुधवारी किमान १७.८ तर कमाल २७.० अंश सेल्सिअस तपमान होते. 


अरबी समुद्रात गोवा आणि मुंबईपासून दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ओखी चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण झाले होते. तर नाशिक जिल्ह्यात झालेल्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कांदा, द्राक्ष, टोमॅटो, हरभऱ्यासह भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. बुधवारी सकाळी ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता लागून होती. मात्र दुपारनंतर आकाश निरभ्र होत गेल्याने सूर्यप्रकाश पडू गेल्याने नागरिकांना दिवसाच्या गारव्यापासून दिलासा मिळाला होता. तर दोन दिवसांपर्यंत वातावरण अंशत: ढगाळ राहणार असल्याने किमान तपमानात घसरण होत जाणार आहे. मात्र, त्यानंतर आकाश निरभ्र होणार असल्याने किमान तपमान पुन्हा ११ ते १२ अंश सेल्सिअसवर येणार असल्याने थंडीचा कडाका पुन्हा जाणवेल. तसेच कमाल तपमानात वाढ होऊन ते २७ ते २८ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. 

बातम्या आणखी आहेत...