आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याने शहरात पुन्हा हुडहुडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने महाराष्ट्रतही किमान तपमानात घट झाली आहे. शुक्रवारी (दि. २२) निफाड येथे किमान तपमानाची ५.०, तर नाशिक शहरात ५.५ अंश सेल्सिअसची नोंद झाल्याने शहरवासीयांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. तीन दिवसांपासून कमाल तपमान हे अंश सेल्सिअसपेक्षा कमीच असल्याने अगदी दुपारपर्यंत थंडीची लहर कायम अाहे.

अरबी समुद्रातील थंड उष्ण वाऱ्यांच्या मिश्रणामुळे ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस पडत अाहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढल्याने महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या हवामानाची अनुभूती नागरिकांना येत अाहे. थंडीच्या हंगामामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये नीचांकी तपमानाची घट होत असते. यावर्षी मात्र डिसेंबर महिन्यापासूनच तपमान घसरू लागल्याने शहरवासीयांना थंडीच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दिनचर्येतदेखील बदल झाल्याचे दिसून येत आहे.विद्यार्थ्यांसह नाेकरी, व्यवसायासाठी सकाळी लवकर उठणाऱ्यांच्या दिनचर्येत विशेषत: थंडीमुळे बदल झाल्याचे दिसून येते. माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत असून, उबदार कपड्यांना मागणी वाढू लागली अाहे. निफाड येथे शुक्रवारी ५.० अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली असून, निफाडसह शहराचेही तपमान अजून घसरण्याचा अंदाज हवामान विभागातील अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत अाहे.
यापूर्वी शहरात नोंदविले गेलेले किमान तपमान...
जानेवारी १९४५ ०.६
१४ फेब्रुवारी १९७२ ०.९
फेब्रुवारी २०१२ २.७
जानेवारी २०१३ ४.४
२९ डिसंेबर २०१४ ६.१
१३ जानेवारी २०१५ ५.७
२५ डिसेंबर २०१५ ५.४
२२ डिसेंबर २०१५ ५.५
एकाच दिवसात अंश सेल्सिअसने घट
नाशिकशहरातील किमान तपमान हे गुरुवारी ७.५ अंश सेल्सिअस होते, तर शुक्रवारी ५.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. एकाच दिवसात दोन अंश सेल्सिअसने तपमानात घट झाली आहे. अजून दोन ते तीन दिवस याचदरम्यान किमान तपमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात अाली आहे.

घट हाेण्याची शक्यता
हवामान कोरडे असल्याने आणि उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने किमान तपमानात घसरण होत आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किमान तपमान हे सरासरी १० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, अचानक ढगाळ वातावरण किंवा पाऊस झाला, तर तपमान वाढेल. - डी. एस. घाटे, वरिष्ठ अधिकारी, हवामान केंद्र