आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Collection Of Money Throw Facebook Give To Hemraj Family

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेसबुकच्या माध्‍यमातून जमा झालेला निधी शहिदा हेमराजच्या कुटुंबीयांना प्रदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झालेले भारतीय जवान हेमराज यांच्या कुटुंबीयांना 50 हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. फेसबुकच्या माध्यमातून जमा झालेल्या दीड लाखाच्या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात हा धनादेश देण्यात आला असून, या निधीच्या माध्यमातून शहीद जवानाच्या मुलांचे शिक्षण करण्यात येणार आहे.

हेमराज यांचे शिर पाकिस्तानी सैनिकांनी पळवल्यानंतर देशभरात संताप उफाळला होता. पण संताप व काळजी व्यक्त करण्यापेक्षा नाशिक येथील सिलिकॉन व्हॅली या शैक्षणिक संस्थेचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड यांनी ‘सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज’ या अभियानाच्या माध्यमातून फेसबुक या सोशल वेबसाइटद्वारे या शहीद हेमराज व सुधाकर सिंग या दोन जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यास केवळ भारतीयांनीच नव्हे तर परदेशी नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिल्याने जवळपास दीड लाखाचा निधी संकलित करण्यात आला आहे. कतार येथील लक्ष्मीकांत पोवनीकर यांनी 44 हजार रुपयांची मदत पाठवली होती.

प्रमोद गायकवाड हे स्वत: मथुरा जिल्ह्यातील शेर खरारी या शहीद हेमराज यांच्या गावी गेले होते. हेमराज यांच्या पत्नी धर्मवती व तीन मुले यांच्याकडे त्यांनी हा धनादेश प्रदान केला. या वेळी हेमराज यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थ उपस्थित होते.