आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्राममधील जागामालकांसोबत जिल्हाधिकारीच करणार चर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्‍टोबरला खास बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साधुग्रामसाठीअधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनमालकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि त्यांचे मन वळविण्यासाठी आता थेट जिल्हाधिकारीच त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी त्यांनी या शेतकऱ्यांची खास बैठक ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित केली आहे.
साधुग्रामला भाडेतत्त्वावर जागा अधिग्रहीत करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार, सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांची नेमणूक केली आहे. त्यांनी 22 आणि 23 सप्टेंबर रोजी 193 पैकी 163 जणांचे म्हणणेही ऐकून घेतले. त्यापैकी बहुतांशी सर्वच शेतकऱ्यांनी कायमस्वरूपी बाजारभावाप्रमाणे जमीन विकत घेण्याची मागणी केली. भाडेतत्त्वावर जमीन देण्यास त्यांनी थेट नकार दिला. याबाबतचा अहवाल संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना दिला. तसेच, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी केली होती.