आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा 18500, अर्ज 27000

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अकरावी प्रवेशअर्जांची मुदत गुरुवारीच संपल्याने आता उपलब्ध जागा आणि आलेले अर्ज यांची निश्चित आकडेवारी समोर आली आहे.

शहरातील महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये उपलब्ध 18 हजार 600 जागांसाठी 27 हजार 230 अर्ज प्राप्त झाले आहेत. विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 14 हजार 66 अर्ज प्राप्त झाले असून, जागा मात्र 6 हजार 760 असल्याने निम्म्या विद्यार्थ्यांना इच्छेनुसार प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे.

बहुतांश महाविद्यालयांमध्ये गुरुवारी शेवटच्या दिवशी प्रवेशासाठी गर्दी झाल्याने केवळ अर्ज जमा करण्यात आले. त्यांची माहिती संगणकात भरण्याचे काम दुसर्‍या दिवशी झाले. त्यानुसार अर्जांचे स्पष्ट आकडे समोर आले आहेत. परंतु अनेक विद्यार्थी प्रवेश न मिळण्याच्या धास्तीने विविध महाविद्यालयांत अर्ज सादर करतात. त्यांचे प्रमाण साधारणत: 15 ते 20 टक्के आहे. हे विद्यार्थी प्रवेश मात्र कुठल्याही एकाच महाविद्यालयात घेत असल्याने अशा विद्यार्थ्यांच्या अर्जाची संख्या त्यातून वगळली जाऊ शकते.

शाखानिहाय अर्ज आणि जागा
वाणिज्य शाखेसाठी शहरातील विविध महाविद्यालयांत 6,720 जागा आहेत. त्यासाठी जवळपास 9, 885 अर्ज आले आहेत. उर्वरित 3, 165 विद्यार्थ्यांना इतर शाखा किंवा इतर कोर्सला प्रवेश घेण्याचा पर्याय निवडावा लागेल.

कला शाखेसाठी शहरात 4 हजार 720 जागा आहेत. त्यासाठी मात्र केवळ 302 अर्ज आल्याने जवळपास 4, 418 जागा रिक्त राहण्याची अथवा त्याजागी वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणार्‍यांना प्रवेश घेण्याची वेळ येऊ शकते. संयुक्तच्या 480 जागा असून, येथेही वाणिज्य आणि विज्ञानच्या काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.