आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालय गजबजले : पहिला दिवस गर्दीचा, विद्यार्थ्यांसह पालकही तासंतास रांगेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अकरावीच्या प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी गुणवत्ता यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी एकच गर्दी केल्याने प्रमुख महाविद्यालयात विज्ञान, वाणिज्य शाखेसाठी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, प्रमुख महाविद्यालयात जवळपास हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

दहावीच्या निकालानंतर सुरू झालेली अकरावी प्रवेश प्रक्रियेचा सोमवारपासून खर्‍या अर्थाने दुसरा टप्पा सुरू झाला. शनिवारी सर्वच महाविद्यालयांनी संवर्गनिहाय गुणवत्ता याद्या जाहीर केल्या. सोमवारी यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. त्यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही महाविद्यालय गाठले. प्रवेशासाठी लागलेल्या रांगेत पालकांनीही उभे राहात आपल्या पाल्याच्या प्रवेशप्रक्रियेत हिरीरीने प्रवेश घेतला.

एका रांगेत पालक, दुसर्‍या रांगेत विद्यार्थी
सर्वच महाविद्यालयांत प्रवेशासाठी रांगा लागल्या होत्या. गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर बहुतांशी महाविद्यालयांनी प्रवेश अर्ज विक्रीची आणि स्वीकृतीसाठी वेगवेगळी सुविधा केली होती. मात्र, दोन्हीकडे रांगा लागल्या होत्या. एका वेळी एकाच रांगेत उभे राहिल्यास अधिक वेळ लागण्याची शक्यता हेरून काही पालकांनी एका रांगेत स्वत:, तर दुसर्‍या रांगेत विद्यार्थ्यास उभे करत प्रवेश शुल्क भरून आजच प्रवेश निश्चिती केली.

केटीएचएम, एचपीटीत गर्दी
विद्यार्थ्यांची के.टी.एच.एम. आणि एचपीटी व आरवायके महाविद्यालयात प्रवेश घेण्याची पसंती असल्याने या महाविद्यालयांना चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र भोसला, पंचवटी, डी. डी. बिटकोसह इतर महाविद्यालयांत दुसर्‍या किंवा तिसर्‍या यादीस प्रतिसाद मिळण्याची शक्यता काही प्राचार्यांनी व्यक्त केली.