आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालये गजबजणार : प्रवेश घेण्यासाठी आजपासून रांगा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहर आणि जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांनी शाखा आणि प्रवर्गनिहाय गुणवत्ता याद्या शनिवारी जाहीर केल्यानंतर सोमवारपासून खर्‍या अर्थाने प्रत्यक्षात प्रवेश देण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्जांची सुविधा असलेल्या महाविद्यालयांमध्येही सोमवारी प्रवेशासाठी रांगा लागणार आहेत.

मागील पंधरा दिवसांपासून अकरावीच्या विविध शाखांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यंदा गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केलेली महाविद्यालयेही गजबजून जातील. गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज दिला जाईल. हा अर्ज आणि शुल्क भरून विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे. 26 जूनपर्यंत गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील, तर 27 जूनला रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. 1 जुलैपर्यंत प्रतीक्षा यादीतील प्रवेश देऊनही शिल्लक राहिलेल्या जागा प्राप्त प्रवेशअर्जांद्वारे गुणांनुसार भरण्यात येतील.