नाशिक - विद्यार्थी नेतृत्वाला प्राेत्साहन देणाऱ्या बहुचर्चित महाविद्यालयीन निवडणुका घेण्यावर पावसाळी अधिवेशनात शिक्कामाेर्तब हाेणार असून, त्यानंतर तातडीने या निवडणुका घेण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. या निवडणुका एसएमएस पद्धतीने घ्याव्यात की थेट अध्यक्षाची निवड करून घ्याव्यात, याचाही मसुदा लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
गुन्हेगारी वर्तन वाढीस लागल्याचे कारण दर्शवित १९९४ पासून महाविद्यालयीन निवडणुकाच बंद करण्याचे धोरण तत्कालीन राज्य शासनाने स्वीकारले होते. त्यानंतर चांगले नेतृत्व पुढे येत नसल्याची जाणीव राजकीय पक्षांना झाली आणि पुन्हा एकदा या निवडणुका घेण्याची चर्चा गेल्या दाेन वर्षांपासून विविध पातळ्यांवरून सुरू झाली आहे. तत्कालीन उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनीही निवडणुका घेण्याचा विचार करता येईल, असे सांगून विद्यार्थी संघटनांच्या मागणीला समर्थन दिले हाेते. त्यानंतर राज्यात सत्तेवर अालेल्या भाजपने विशेषत: शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनीही महाविद्यालयीन निवडणुकांना समर्थन देत या निवडणुका घेण्याचे सूताेवाच केले हाेते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू हाेण्याची वेळ अाली असतानाही निवडणुकांसंदर्भातील भूमिका राज्य शासनाने अद्याप स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली हाेती. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने थेट शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती जाणून घेतली. महाविद्यालयांतून राजकीय आणि सामाजिक नेतृत्व उभे राहावे, यासाठी महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांच्या निवडणुका घेतल्या जातील. या निवडणुका शांततामय वातावरणात व्हाव्यात, यासाठी प्रक्रियेत आवश्यक बदलही केले जातील, असे तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवीन कायदा पूर्णत: असेल विद्यार्थिभिमुख
राज्यातील यापूर्वीच्या विद्यापीठ कायद्यावर कुलगुरू अाणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचीच छाप हाेती. त्याच अनुषंगानेच हा कायदा तयार करण्यात अाल्याचा अाक्षेप तज्ज्ञांकडून घेतला जात हाेता. नवीन कायदा मात्र विद्यार्थिभिमुख असेल, असे तावडेंनी स्पष्ट केले.
चिकित्सा समितीच्या बैठकीत विचारमंथन
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ चा मसुदा जवळपास तयार असून, चिकित्सा समितीच्या बैठकीत त्याबाबत नुकतेच विचारमंथनही झाले अाहे. ही समिती विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात सादर करेल. त्यात महाविद्यालय निवडणुकीची तरतूद अाहे. ताे संमत झाल्यास येत्या शैक्षणिक वर्षात निवडणुका हाेतील. त्याची प्रक्रिया अद्याप निश्चित नाही. - विनाेद तावडे, शिक्षणमंत्री