आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथमच मतदानाचा अानंद, पण यंत्रणेतील घाेळाने नाराजी; युवतींची मतदानाबाबतची प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाविद्यालयांत दुसऱ्याच दिवशी मतदानाच्या अनेक तरुणींनी पहिल्यांदा मतदान केल्यानंतर आपली मते मांडली. मतदान प्रथमच केल्याचा आनंद त्यांना हाेत होता, परंतु निवडणूक यंत्रणेबद्दल सगळ्यांनीच कटुता व्यक्त केली. 
 
यंत्रणेमध्ये प्रामुख्याने सगळ्यांनी आपले नाव शोधण्यासाठी अाॅनलाइन पर्याय अवलंबला. मतदान केंद्रांवर जाऊन मुलींची नावे यादीत नसणे हा त्रास सगळ्यांनाच सहन करावा लागला. मुलींना मतदान करण्यासाठी कोणतीही माहिती मिळत नव्हती, केंद्रांवर मतदान सुरू झाल्यापासून सायंकाळपर्यंत महिला बूथवर बसल्या होत्या. पण, पहिल्यांदा मतदान करणाऱ्या व्यक्तींना नक्की कुठे स्लिप दाखवायची आणि कुठे बूथ शोधायचे यात संभ्रम होता. दिशा सांगण्यात आल्यामुळे ही अडचण येत होती, असे मत व्यक्त झाले. महिलांच्या मतदानासाठी बूथवर वेगळी रांग असावी, पिण्याच्या पाण्याची सोय असावी, अशा सूचना मुलींनी मांडल्या. 
 
ज्यावेळी मतदानासाठी नागरिक बाहेर पडतात तेव्हा त्यांना मतदान हे त्रासदायक वाटायला नको. मतदान त्रासदायक वाटले तर आपसूक मतदानाचा टक्का घसरणार आहे. त्यासाठी चांगल्या सुविधा, पार्किंगची व्यवस्था, प्रबळ ऑनलाइन व्यवस्था आणि सुरक्षित वातावरण अशा गोष्टी अपेक्षित आहेत. 
 
महिलांच्या मतदानाचा टक्का याहीवर्षी कमी असल्याचे दिसते, यासाठी गृहिणी आणि मतदानासाठी बाहेर पडू शकणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न जाणून घेण्याची, त्यावर उपाययाेजना करण्याची गरज आहे. मतदान केल्यानंतर अनेकांना आपण महत्त्वाच्या अशा लाेकशाही व्यवस्थेचा भाग आहोत याची जाणीव झाली. काहीअंशी प्रक्रियेमध्ये त्रास असला तरी मतदान करणे हे गरजेचे आहे हे जाणून घेतले गेले. 
 
याद्यांमध्ये नाव शोधण्याचा नकोसा त्रास.. 
परिसरांमध्ये नेमून दिलेल्या बूथवर जाऊन मतदान करण्यासाठी आधी पारंपरिक पद्धतीने याद्या तपासायच्या होत्या. मग यामध्ये आपली नावे शोधायची होती. यात अडचणी येत होत्या. पोलिसांचा त्यात वेगळा व्यत्यय होता. कुठे पार्किंगवरून भांडण, कुठे सोबत आलेल्या लोकांची वाट पहात उभे राहू नका, असा कंटाळवाणा कार्यक्रम असेल तर लोक मतदान करण्यास येण्यापेक्षा सुटी एन्जॉय करणं पसंत करतील - भूमी पटेल. 
 
एकाच्या मतदानाचा फरक पडतो 
पहिल्यांदामतदानकरताना अनेकदा सूचना येतात की पक्ष बघा, मतदार बघा, चिन्ह बघा वगैरे. पण लोकांच्याच काय अगदी घरच्यांच्या मतानुसारसुद्धा आपले मत व्यक्त करू नये, असे वाटत होते. कारण मतदान हे तुमच्या विचारशक्तीला चालना देण्याचा प्रकार आहे. मुळात मतदान केल्यानंतर तेथे असलेल्या वातावरणाचा जास्त परिणाम होत होता. पोलिसांची अरेरावी आणि उमेदवारांचे चमचे यामुळे केंद्रांवरचे वातावरण मलिन झाल्यासारखे वाटत होते - हर्षदा कुंभकर्ण. 
 
 
बातम्या आणखी आहेत...