आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोरांचा कल्ला.. महाविद्यालयात डेज सेलिब्रेशनची धूम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये डे‌्ज सेलिब्रेशनची धूम सुरू आहे. आपण आणि आपला ग्रुप कसा वेगळा दिसेल, यासाठी कॉलेजियन्सची धावपळ बघण्यासारखी आहे. सॅव्ही फॅशन डिझायिनंग कॉलेज, सीएमसीएस, एनबीटी, व्ही. एन. नाईक महाविद्यालयात मंगळवारी हेच धमाल मस्तीचे वातावरण िदसून आले.
सॅव्ही कॉलेज
डे धमालमध्ये मंगळवारी सॅव्ही कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंगमध्ये विद्यार्थ्यांनी ग्रुप डे आणि टपोरी डे मोठ्या जल्लोषात साजरा केला. या वेळी िवद्यार्थिनींनी केलेली टपोरी वेशभूषा सर्वांनाच अवाक‌् करणारी ठरली.

सीएमसीएस कॉलेजात पुष्परचना स्पर्धा...
मविप्र संस्थेच्या सीएमसीएस कॉलेजात डेज धमालसोबतच आयोजित करण्यात आलेल्या पुष्परचना स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत सहभागी िवद्यार्थ्यांनी इंधन वाचवा, भारताची अंतराळ भरारी आदी सोविष्र यांसह आकर्षक फुलांच्या रांगोळ्याही काढल्या होत्या. ज्याद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला. मंगळवारी महाविद्यालयात डेज सेलिब्रेशनअंतर्गत सारी डे, टाय डे, रोझ डे, तसेच ग्रुप डे मोठ्या उत्साहात साजरा झाले. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.