आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगत स्पेक्ट्रम उत्सवाची : क्लासमेट्सची दुनियादारी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील कॉलेज कॅम्पस‌् शुक्रवारीही डेजच्या धमाल उत्साहात रंगून गेले होते. डेजच्या या उत्साहात भुजबळ नॉलेज सिटीमध्ये "एंटरटेन्मेंट डे', ‘पंचवटी एमबीए’ कॉलेजात "मिसमॅच डे' तर, सॅव्ही कॉलेजात विद्यार्थ्यांनी "ट्रॅडिशनल डे' साजरा केला. महाराष्ट्राची परंपरा दाखविणाऱ्या वेशभूषांपासून काही क्लासिकल पात्रांच्या भूमिकेत आलेल्या विद्यार्थ्यांमुळे कॉलेज कॅम्पस‌्चा सारा माहोलच पालटून गेला होता.
नाशिक- आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये सुरू असलेल्या मेट उत्सवांतर्गत शुक्रवारी विद्यार्थ्यांनी "एण्टरटेन्मेंट डे' जल्लोषात साजरा केला. "डे'जचे सेलिब्रेशन करतानाच महाविद्यालयात विविध मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यात विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षा व्यसनमुक्तीचा जागर केला.

आजग्रॅण्ड फिनाले
मेटउत्सवाचा शनिवारी (दि.२४) "ग्रॅण्ड फिनाले'ने समारोप होणार आहे. या बहारदार कार्यक्रमात विविध २९ इव्हेंट्सचे सादरीकरण होणार असून, सुमारे १० हजार विद्यार्थी पालकांच्या उपस्थितीत "फिनाले'चा जल्लोष रंगणार आहे. या कार्यक्रमास मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे चेअरमन छगन भुजबळ, विश्वस्त समीर भुजबळ, पंकज भुजबळ शेफाली भुजबळ यांच्यासह विद्यार्थी पालक सहभागी होणार आहेत. "कल्चरल नाईट' कार्यक्रमाची विशेष व्यवस्था असून, विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहण्याची संधी मिळणार आहे.
‘पंचवटी एमबीए’मध्ये धमाल "मिसमॅच डे'ची
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर महाविद्यालयात शुक्रवारी "मिसमॅच डे'ची धमाल दिसून आली. विद्यार्थ्यांनी अफलातून वेशभूषा परिधान करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे भन्‍नाट फोटोग्राफ्स...