आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS - अशी ही हिरोपंती... महाविद्यालयांमध्ये धमालमस्तीचे वातावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या डे‌ज सेलिब्रेशनमध्ये बुधवारी ग्रुप डे, सारी डे, िमस मॅच डे, ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात आला. यात सर्वाधिक आकर्षण ठरले ते रेट्रो डेचे... सॅव्ही कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग, सीएमसीएस, एनबीटी, फार्मसी कॉलेज, बिटको चांडक महाविद्यालयात बुधवारी सिनेतारकांसह देवदेवताही अवतरल्या होत्या. सर्वत्र धमालमस्तीचे वातावरण होते.
गाेखले एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजमध्ये बुधवारी ग्रुप डे, सारी डे, ट्विन्स डे आणि रेट्रो डे साजरा करण्यात आला.

बिटको चांडक कॉलेज
सॅव्ही कॉलेज
फार्मसी कॉलेज
एनबीटी कॉलेज
नाशिकरोड येथील चांडक बिटको महाविद्यालयात मिस मॅच डे साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी अगदी िवचित्र वेशभूषा परिधान करून उपिस्थतांचे लक्ष वेधले. यात विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींचाही उत्साह वाखाणण्यासारखा होता.

डे धमालमध्ये बुधवारी सॅव्ही कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंगमध्ये विद्यार्थिनींनी रेट्रो आणि बॉलिवूड डे साजरा करताना प्रसिद्ध सिनेतारकांच्या अगदी हुबेहूब पण हटके अशा वेशभूषा साकारल्या होत्या. यामुळे महाविद्यालयात जणू काही संपूर्ण बॉलिवूडच अवतरल्याचा भास होत होता.

एनबीटी लॉ कॉलेजमध्ये बुधवारी रेक्ट्रो आणि बॉलीवूड डे साजरा करण्यात आला. या वेळी विविध हिंदी-मराठी िचत्रपटांतील अिभनेत्यांची वेशभूषा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारली होती.

सीएमसीएस कॉलेज
सीएमसीएस महाविद्यालयात रेट्रो, ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी देवदेवतांसह अ िभनेत्यांच्या तसेच, विविध पारंपरिक वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले.