आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Colleges Affiliation Will Be Check, Pune University Campaign

महाविद्यालयांची बिंदुनामावली तपासणी, पुणे विद्यापीठातर्फे मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे २०१५ २०१६ या शैक्षणिक वर्षासाठी संलग्न महाविद्यालये संस्थांमधील शिक्षक शिक्षकेतर पदांसंबंधीच्या बिंदुनामावलीची प्राथमिक तपासणी करून घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक, पुणे,नगर जिल्ह्यांतील महाविद्यालये संस्थांच्या बिंदुनामावलीची प्राथमिक तपासणी करून घेण्याची कार्यवाही विद्यापीठाच्या आरक्षण कक्षाकडून सुरू झाली आहे.

विद्यापीठाच्या आरक्षण कक्षातर्फे शासनाच्या निर्णयानुसार महाविद्यालये संस्थांमधील शिक्षक शिक्षकेतर पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी बिंदुनामावली तपासणी त्यात शासन आदेशानुसार आरक्षण ठेवणे बंधनकारक आहे. शैक्षणिक वर्ष २०१५ २०१६ याकरिता पुणे, अहमदनगर नाशिक या जिल्ह्यांमधील सर्व संलग्न महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थांच्या बिंदुनामावलीची प्राथमिक तपासणी करून देण्याची कार्यवाही सुरू झाली असून, १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
विद्यापीठ आरक्षण कक्षामार्फत ही प्राथमिक तपासणी करण्यात येणार असून, प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार पुणे जिल्ह्यामधील महाविद्यालये संस्थांनी पुणे येथील मागासवर्ग कक्षातील सहायक आयुक्त, तर अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये संस्थांनी नाशिकरोड येथील आयुक्तालयातील सहायक आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बिंदुनामावली प्रमाणित (अंतिम तपासणी) करून घेतल्यानंतरच पुढील शिक्षक शिक्षकेतर पदे भरण्याची कार्यवाही करता येणार आहे, अशी सूचना केली आहे.

पद निश्चितीचे पत्र सादर करणे आवश्यक : सर्वसंलग्न महाविद्यालये आणि संस्थांनी पदनिश्चितीबाबतचे पत्र सादर करणे आवश्यक आहे. शासनाने बिंदुनामावली नोंदवहीत बदल सुचविलेला असल्याने त्यानुसार सुधारित पद्धतीप्रमाणे बिंदुनामावली तयार करण्यात यावी. महत्त्वाचे म्हणजे, बिंदुनामावली तयार करताना जुलै १९९७ या दिवशी त्यानंतर कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोंद घेण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.