आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरात पुन्हा कोम्बिंग; 40 सराईत ताब्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सोनसाखळी आणि वृद्धांचे सोने लुटीचे सत्र सुरू झाल्याने पोलिसांनी पल्सर दुचाकीचालकांची विशेष तपासणी मोहीम व कोम्बिंग ऑपरेशन राबवले. 100 हून अधिक सराईत गुन्हेगारांची तपासणी करीत 40 जणांना ताब्यात घेण्यात आले. 110 हून अधिक वाहनचालक, 30 हून अधिक मद्यपी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अथवा एकटे गाठून सोनसाखळी चोरी होत आहे. गेल्या दहा दिवसांत अशा पाच-सहा घटना घडल्याने पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त साहेबराव पाटील, डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. पंचवटीतील वज्रेश्वरी, वाल्मीकनगर, ओंकारनगर व आडगाव येथील वसंतदादानगर, सरकारवाडा हद्दीतील मल्हारखाण, गंगापूररोडवरील सिद्धार्थनगर, संत कबीरनगर, गंजमाळ येथे मोहीम राबवण्यात आली.