आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकरोडला गर्दीच्या ठिकाणी कोम्बिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - पुणे बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, सहायक आयुक्त डॉ. डी.एस. स्वामी, अविनाश अंबुरे यांच्या उपस्थितीत शहरात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या बरोबरच सुरक्षारक्षक, कर्मचार्‍यांना सुरक्षेबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.

गुरुवारी सायंकाळी फेम चित्रपटगृहापासून कोम्बिंग सुरू झाले. बिगबाजार, सिनेमॅक्स व नाशिकरोड बसस्थानकावर रात्री उशिरापर्यंत हे ऑपरेशन सुरू होते. सरंगल यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांकडून सुरक्षेची माहिती घेतली. नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई केली जात असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. यावेळी शहरातील सर्व हॉटेल, लॉजची कसून तपासणी केली.
महत्त्वाच्या स्थळी गस्त वाढवली - देशाला चलन व महत्त्वपूर्ण कागदपत्राचा पुरवठा करणारा करन्सी नोट प्रेस, इंडिया सिक्युरिटी प्रेस, महसूल आयुक्त कार्यालय, गांधीनगर विमानतळ, आर्टिलरी सेंटर, रेल्वे स्टेशन या भागात गस्त वाढविण्यात आली आहे.
संशयितांवर कारवाई सुरू - गोरेवाडी, शास्त्रीनगरात 25 पोलिसांच्या पथकासह सायंकाळी 4 ते 6 वाजेदरम्यान केलेल्या कोम्बिंगमध्ये अजामीनपात्र वॉरंट असलेले तीन जण व एका संशयिताला ताब्यात घेतले असून, 13 वाहनांवर कारवाई करण्यात आली.
कारवाई करा - रेल्वे स्थानक आवारातील नो-पार्किंग झोनमधील वाहनांवर कारवाई करून ती थेट भुसावळला पाठवून दैनंदिन माहिती द्यावी. दोन पोलिसांची ड्युटी लावून नो पार्किंग झोन मोकळा ठेवावा. कुलवंतकुमार सरंगल, पोलिस आयुक्त
सुरक्षारक्षकांना सूचना - चित्रपटगृहातील सुरक्षारक्षक, कर्मचार्‍यांनी नागरिकांची कसून तपासणी करावी, वस्तू ठेवणार्‍या नागरिकांच्या नाव, पत्ता, फोन नंबरची नोंद करावी. तसेच संशयास्पद वस्तूची तपासणी करून हात लावावा किंवा पोलिसांना कळवावे. डॉ. डी. एस. स्वामी, पोलिस उपआयुक्त