आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंचवटीत पुन्हा कोम्बिंग; 18 गुन्हेगार ताब्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी - पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पुन्हा एकदा कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येऊन 18 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. वैध कागदपत्रे नसलेल्या 38 दुचाकीही जप्त करण्यात आल्या.
आठवडाभरापूर्वीच पंचवटीत कोम्बिंग ऑपरेशन झाले होते. मात्र, त्यावेळी अवघ्या 13 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. शनिवारी पहाटे पोलिस उपायुक्त, सहआयुक्त यांच्यासह 75 कर्मचार्‍यांचा फौजफाटा परिसरात दाखल झाला. उपायुक्त साहेबराव पाटील, सहआयुक्त गणेश शिंदे, अविनाश अंबुरे, निरीक्षक नरेंद्र पिंगळे, डॉ. सीताराम केल्हे यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी वज्रेश्वरी झोपडपट्टी, एरंडवाडी, नवनाथनगर, अंबिकानगर, फुलेनगर या भागात पहाटे पाचच्या सुमारास छापा मारला. एकूण 75 दुचाकी जमा करण्यात आल्या. 37 वाहनांची कागदपत्रे वैध आढळल्याने त्या पुन्हा मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या, तर योग्य कागदपत्रे नसलेली 38 वाहने जप्त करण्यात आली.

पापा मुस्तफा सय्यद, जीतू नंदू झनकर, प्रवीण अरुण लोखंडे, संतोष अण्णा पवार, संतोष राजाराम पगारे, गणेश तानाजी दातीर, विजय भरत वैराळ, सोनू सुखदेव पवार, मदन बाळकृष्ण गायकवाड, विनोद विजय दिवे, कृष्ण लक्ष्मण करडे या सराईत गुन्हेगारांसह 18 जणांना ताब्यात घेण्यात आले. आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी राबवलेल्या या कारवाईचे पंचवटीसह शहरात जोरदार स्वागत होत आहे. या कारवाईमुळे पंचवटीमधील गुन्हे काही प्रमाणात का होईना कमी झाले आहेत. आणखी काही दिवस ही कारवाई अशाच पद्धतीने सुरू राहिली तर गुन्हेगारीचा नायनाट होईल, असे बोलले जात आहे.

पंचवटी पोलिस ठाण्याचे सुनील माळी, उमेश डहाळे, राजेश लोखंडे, येवाजी महाले, विजय वरंदळ, संपत सानप, अवी जाधव, विजय गवांदे, राजू राऊत यांच्यासह कर्मचार्‍यांनी कारवाई केली.