आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Come Out Durga Bhagwat's Shadow, Dr.Sadanand More Appeal Literature

दुर्गा भागवतांच्या छायेतून बाहेर पडा, डॉ. सदानंद मोरे यांचे सारस्वतांना आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साहित्य संमेलनात होणा-या राजकीय हस्तक्षेपाचे थोडक्यात समर्थनच करत मराठी साहित्याने दुर्गा भागवत यांच्या छायेतून बाहेर यावे, असे प्रतिपादन घुमान येथे होणा-या ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे हे दोन दिवसांसाठी नाशिक दौ-यावर होते. या वेळी रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोकळेपणाने वार्तालाप केला.

मोरे म्हणाले, दुर्गा भागवतांच्या साहित्यातून बाहेर पडण्याचा हाच काळ आहे. त्यामुळे हस्तक्षेपासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची वेळच येऊ नये. संतसाहित्य हा मराठी साहित्याचा पाया आहे. आधुनिक पिढीपर्यंत हे साहित्य रुजण्यासाठी आधुनिक माध्यमांचा म्हणजे संकेतस्थळे, सोशल मीडिया यांचा वापर करणे अपरिहार्य झाले आहे. त्यापासून अलिप्त राहणेही शक्य नाही. आज संकेतस्थळावर केलेल्या एका क्लिकसरशी ज्ञानेश्वरी खुली होते.

तुकारामांच्या गाथाही अनेक संकेतस्थळांवर वाचायला मिळतात. फेसबुकसारख्या माध्यमाद्वारेही संतसाहित्याचे अभ्यास मंडळ तयार झाले आहे. त्यामुळे साहित्याला आधुनिक माध्यमापासून दूर ठेवताच येणार नाही. ब-याच वेळा साहित्य संमेलनांकडून अवास्तव अपेक्षा व्यक्त केल्या जातात. संमेलन म्हणजे प्रयोग करण्याची जागा वा प्रकल्प राबवण्याचे व्यासपीठ असाही समज काहींचा होतो. परंतु संमेलनाचे व्यासपीठ हे विचारांचे असते. तेथे साहित्याशी संबंधित वैचारिक मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित असते.

दुर्गा भागवतांचा असा आहे संदर्भ
कऱ्हाड येथे आणीबाणीच्या काळात म्हणजे १९७५ मध्ये झालेल्या ५१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषणात बोलताना ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांनी साहित्य संमेलनातून राजकारण्यांनी दूर राहण्याचा मुद्दा कटाक्षाने मांडलाहोता. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे यशवंतराव चव्हाण होते. चव्हाण हे स्वत: चांगले साहित्यिक होते. शिवाय, सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांचा परिचय होता. त्यामुळे भागवत यांचे वक्तव्य त्या काळात कमालीचे वादग्रस्त ठरले होते. हा संदर्भ घेत मराठी साहित्याने दुर्गा भागवतांच्या छायेतून बाहेर यावे, अशी स्पष्टोक्ती डॉ. सदानंद मोरे यांनी नाशकात शनिवारी दिली.