आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coming Election Raj Thakare Fixed Candidate For Loksabha

आगामी लोकसभेसाठी मनसेच्या उमेदवार निश्चितीचे राज ठाकरेंकडून संकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुरू झालेली महायुती चर्चा आणि टाळी देण्या-घेण्याची चढाओढ अशा ‘माहोल’मध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे रविवारी सायंकाळी नाशिकच्या आपल्या बालेकिल्ल्यात आगमन झाले. ठाकरे यांनी अगदी मोजक्या मंडळींशी केलेल्या चर्चेतून आगामी लोकसभेसाठी मनसेच्या उमेदवार निश्चितीचे संकेत प्राप्त होत आहेत.


या वेळी राज यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. विधानसभेत नाशिकमधून तीन आमदार निवडून आले आहेत. मागील लोकसभेत मनसेचे हेमंत गोडसे केवळ बावीस हजार मतांनी पराभूत झाले होते. मात्र, पराभव झाला तरी हे यश ऐतिहासिक मानले जात होते. त्यानंतर नाशिककरांनी राज यांच्यावर विश्वास टाकत महापालिकेची सत्ताही मनसेच्या हाती दिली. काही दिवसांपूर्वीच हेमंत गोडसे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा भगवा हाती घेतला होता त्यानंतर त्यांनी केलेल्या आरोपांमुळे शिवसेना-मनसेत कलगीतुरा रंगला होता. या पार्श्वभूमीवर राज यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.