आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७६२ काेटींच्या दायित्वावरून नगरसेवक-अायुक्त सामना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी महापालिका निवडणुकीच्या ताेंडावर ७६२ काेटी रुपयांच्या दायित्वाच्या मुद्यावरून सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विराेधकांचे प्रशासनासाेबत खटके उडण्याची चिन्हे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी वेळाेवेळी दायित्वाची चुकीची व्याख्या करून सत्ताधाऱ्यांना अडविले जात असल्याची तक्रार करीत ज्या कामांचे कार्यारंभ अादेश दिले, तीच रक्कम दायित्वात पकडा, असा नगरसेवकांचा अाग्रह हाेता. हा हिशेब धरला, तर १७७ काेटी रुपयांची चालू कामे वगळता ३१९ काेटी रुपये नवीन कामांसाठी उपलब्ध हाेऊ शकतील. अर्थात, अाता प्रशासन त्यानुसार मान्य करणे शक्य नसल्यामुळे उभयतांमधील संघर्ष अटळ मानला जात अाहे. त्यामुळे ७६२ काेटींच्या दायित्वावरून आता नगरसेवक विरुद्ध अायुक्त असा सामना रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

स्थायी समितीसमाेर महापालिकेच्या अायुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात ७६२ काेटी रुपयांचे दायित्व दाखविले असून, अंदाजपत्रकात ४९६ काेटी रुपयेच भांडवली खर्चासाठी उपलब्ध करून दिले अाहेत. या पार्श्वभूमीवर निव्वळ मागील कामेच पूर्ण करण्याचे ठरले, तर महापालिकेला २६६ काेटी रुपये अतिरिक्त लागतील. अाता प्रशासनापेक्षा दायित्वाच्या व्याख्येबाबत नगरसेवकांचे नेमके उलट म्हणणे अाहे. ज्या कामांना कार्यारंभ अादेश दिले, तीच रक्कम दायित्वासाठी विचारात घ्यावी, अशी मागणी वेळाेवेळी करण्यात अाली.
उपमहापाैर गुरुमित बग्गा यांनी महासभेत वारंवार दायित्वाचा चुकीच्या पद्धतीने हिशेब हाेत असल्याचे सांगत एकतर कार्यारंभ अादेश दिल्याची रक्कम दायित्वात घ्या किंवा कार्यारंभ अादेशापासून प्रभागापर्यंत मंजूर कामांचे अाकडे वाटत असेल, तर सरसकट सर्वच रक्कम दायित्वात पकडा, असे अाव्हान दिले हाेते. सरसकट रक्कम पकडली, तर संबंधित कामे पूर्ण करून दाखविण्याचे अाव्हानही स्वीकारावे, असे त्यांनी सांगितले हाेते.

दरम्यान, दायित्वाचा मुद्दा अद्याप भिजत असून, अाता कार्यारंभ अादेशाचा विचार करून दायित्व ठरवले, तर १७७ काेटी रुपयांच्या कार्यारंभ अादेशानुसार हिशेब केला, तर ४९६ काेटींतून ही रक्कम वगळता ३१९ काेटी रुपये नवीन कामांसाठी मिळू शकतील. त्यामुळे संदिग्ध स्थिती निर्माण हाेण्याची चिन्हे अाहेत.

बंधनात्मक खर्च जाता २५६ काेटी हाती
अायुक्तांनी अंदाजपत्रकात १३५७ काेटींची विगतवारी मांडली असून, त्यात ७८३ काेटी बंधनात्मक खर्च म्हटले अाहे. याव्यतिरिक्त मुकणे, सिंहस्थ कामे, जमीन संपादन, राखीव निधी, उचल रक्कम वगळता २५६ काेटी रुपये नवीन कामांसाठी उरणार अाहे. मात्र, हा निधी नवीन कामांसाठी असेल की दायित्वासाठी वापरला जाईल, याबाबत स्पष्टता नाही.