आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - गोदा प्रदूषणावरील उपाययोजनांसंदर्भात 31 मार्चपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना दिल्याची माहिती याचिकाकर्ते व गोदावरी गटारीकरणविरोधी मंचचे कार्यकर्ते राजेश पंडित यांनी दिली. सुनावणी 2 एप्रिलला होईल.
बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोदावरीच्या प्रदूषणाची पातळी, विविध ठिकाणी घेतलेले नमुने याबाबतचा अहवाल न्यायालयासमोर ठेवला. मंचनेही स्वत:ची निरीक्षणे, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे न झालेल्या उपाययोजना व ‘दिव्य मराठी’च्या स्पेशल रिपोर्टची कात्रणे सादर केली. न्यायालयाने कागदपत्रे दाखल करून घेत महापालिकेला प्रदूषणासंदर्भातील उपाययोजना व ठोस योजनेची अंमलबजावणी याबाबतचे प्रतिज्ञापत्र 31 मार्चपर्यंत सादर करावे, असे आदेश दिले. न्या. अभय ओक व मृदला भास्कर यांच्यासमोर सुनावणी झाली.
फौजदारी कारवाई शक्य
गोदावरीत जनावरे, वाहने व अन्य वस्तू धुण्याचे प्रमाण मोठे आहे. याबाबत युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने 2 एप्रिलला होणार्या सुनावणीसाठी पोलिस आयुक्तांना सूचना देऊन पोलिस उपायुक्त दर्जाच्या एका अधिकार्याला उपस्थित राहण्यास सांगण्याचे आदेश दिले. फौजदारी कारवाई करून ही समस्या सोडवता येईल का, यावर संबंधित विचार करत आहेत. राजेश पंडीत, याचिकाकर्ते
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.