आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागर: उठा, चला जाऊया गोदा स्वच्छतेला...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आगामी कुंभमेळा ‘हरित कुंभ’ म्हणून साजरा करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत शासन, पर्यावरणप्रेमी संस्था, आणि हजारो स्वयंसेवक शुक्रवारी (दि. ५) सकाळी वाजेपासून गोदावरी, नासर्डी आणि वाघाडीसह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता करणार आहेत. अद्याप या मोहिमेत सहभागी होऊ शकलेल्या नाशिकवासीयांनीही आपल्या दैनंदिन व्यस्त कार्यक्रमातून अवघे पाच तास स्वच्छतेसाठी दिले तर शहरातल्या जीवनदायिनी चैतन्याने खळाळून वाहतील. तर चला, उठा हाती घ्या झाडू अन् फावडे. सारे मिळून करू या गोदामाई स्वच्छ...
प्रशासनाने प्रथमच हरित कुंभ संकल्पनेअंतर्गत भव्य स्वरूपात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत शहरातील नद्यांसह महत्त्वाच्या ठिकाणांची स्वच्छता केली जाणार आहे. त्यासाठी महापौर, उपमहापौर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांसह सर्व शासकीय विभाग, पर्यावरणप्रेमी-स्वयंसेवक शहरातील विविध ६९ स्थळांवर श्रमदान करीत संपूर्ण शहरच स्वच्छ करणार आहेत. त्याचे नियोजनही झाले आहे. प्रत्येक स्थळाच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वतंत्र गटाकडे देण्यात आली आहे.

या महत्त्वाकांक्षी मोहिमेत सहभागी होऊ शकलेल्या नागरिकांनी सकाळी आपल्या घराजवळील कुठल्याही स्थळावर स्वत:चा झाडू आणि आवश्यक असल्यास फावडे आदी साहित्य घेऊन या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

चहा-पानाची व्यवस्था
यामोहिमेतील स्वयंसेवकांसाठी त्या-त्या परिसरातील नगरसेवक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, देवस्थान ट्रस्टच्या वतीने चहा-पानाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

‘दिव्य मराठी’चे आवाहन
सिंहस्थ कुंभपर्व प्रदूषणमुक्त होण्यासाठी स्वच्छ गोदावरीसाठी या अभियानात संस्था आणि नागरिकांनी आपला हातभार लावण्याची गरज आहे. या अभियानात सहभागी होऊन मोहीम राबविलेल्या ग्रुपने आणि नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करतानाचे आपले फोटो ७७७००५९००९ किंवा ९८२२११४४३८ या व्हॉट‌्सअॅप क्रमांकावर टाकावा. कृपया कॉल करू नये. आपल्या फोटोंना योग्य ती प्रसिद्धी दिली जाईल.
रघुनाथ गावडे - अपरजिल्हाधिकारी ९८२२३५०४६०,०२५३-२३१९९१५, २३१९९१६

कार्यकर्त्यांनाही आवाहन...
खासदार, आमदार , जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगसेवकांसह सर्वच लोकप्रतिनिधींना प्रशासनाच्या वतीने या मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. ते आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी झाल्यास सकारात्मक संदेश जाणार असल्याने तशी विनंतीही त्यांना करण्यात आली आहे.

२३ हजार स्वयंसेवक करणार स्वच्छता
प्रत्येकनदीच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. २३ हजार स्वयंसेवक मोहिमेत सहभागी होणार आहेत. गोदावरी - ८५००, वाघाडी - ४०००, नंदिनी (नासर्डी)- ६०००, कपिला- ६०० आणि शहरातील इतर महत्त्वाच्या स्थळे -४००० असे साधारणपणे िनयाेजन आहे.

लोकप्रतिनिधी अधिकारी या ठिकाणी
>महापौर: आयटीआय पुल ते फिल्ट्रेशन प्लँट
>महापालिका आयुक्त : फिल्ट्रेशनप्लँट ते दोंदे पूल (नासर्डी)
>उपमहापौर: दोंदेपूल ते मिलिंदनगर (नासर्डी)
>जिल्हाधिकारी: सोमेश्वर मंदिरापासून संपूर्ण गोदावरी
>विभागीयआयुक्त : वृंदावन कॉलनी ते तुलसी आय हॉस्पिटल (नासर्डी)
>पोलिस आयुक्त : रामकुंड परिसर