आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमॅट आता वर्षातून दोनऐवजी एकदाच, अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आतापर्यंत वर्षातून दोनदा घेतली जाणारी कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट (सीमॅट) आता वर्षातून एकदाच घेतली जाणार आहे. याबाबतचा निर्णय ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) जाहीर केला आहे. हा निर्णय शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ पासून लागू होणार आहे.

२०१२ पासून एआयसीटीईच्या माध्यमातून व्यवस्थापन शाखेच्या पदव्युत्तर पदव्यांसाठी म्हणजेच एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट यांसारख्या अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा घेतली जात असे. या परीक्षेनंतर विद्यार्थी भारतातील सर्वोत्तम व्यवस्थापन महाविद्यालयांत प्रवेश घेऊ शकतात. यावर्षी सप्टेंबरमध्ये होणारी सीमॅटची परीक्षाही याच कारणाने पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे जानेवारी २०१६ मध्ये सीमॅट परीक्षा होणार असल्याचे सांगितले जाते. वर्षातून दोन वेळा म्हणजे फेब्रुवारी सप्टेंबरमध्ये साधारण या परीक्षा घेतल्या जात असत. जानेवारीमध्ये होणाऱ्या सीमॅट परीक्षेच्या सूचना लवकरच एआयसीटीईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना या परीक्षेचे अर्ज आणि बदललेल्या सूचनांविषयीदेखील माहिती दिली जाणार आहे. या वर्षअखेरीस विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र, रोल नंबर, परीक्षेचे वेळापत्रक, ठिकाण इत्यादी सूचना कळविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. यासंदर्भातील सूचना एआयसीटीईच्या संकेतस्थळावर दिल्या आहेत.