आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Communicable Disease,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डेंग्यूसह साथीच्या आजारांचा फैलाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेकडून होणा-या दुर्लक्षामुळेच शहरात डेंग्यूसह विविध साथरोगांचा आणि अस्वच्छतेचा फैलाव होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. डेंग्यूच्या अनेक रुग्णांसह विविध साथरोगांचे हजारो रुग्ण शहरात आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.
जुने नाशिक, वडाळगाव, सिडकोसह शहरात विविध ठिकाणी अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या महिन्यापासून पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांत रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. यात टायफॉइड, मलेरिया, थंडी-ताप, सर्दी-खोकला, हायपाय गळून जाणे, घसा दुखणे, अतिसार आदी विकारांच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे नियोजन नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जुने नाशिक व वडाळगावात अनेक ठिकाणी आरोग्याच्या प्रश्नाने नागरिकांना भेडसावून सोडले आहे. त्यातच उकिरड्यावर टाकण्यात येणाऱ्या ओल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. जुन्या नाशकातील काही भागात अनेक दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, महिलावर्ग याबाबत नाराज आहे.
औषध फवारणी सुरू करावी : काही दिवसांपासून पूर्व विभागातील औषध व धूर फवारणी बंद असल्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेस्ट कंट्रोलचा ठेका संपला, तरी ठेकेदाराला एक महिन्याची मुदतवाढ दिली जात आहे. गुरुवारीच या ठेक्याची मुदत संपली आहे. मात्र, या सर्व गोंधळात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मुदतवाढ देणार
पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याची मुदत गुरुवारी संपली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होऊ शकते. त्यामुळे शहरातील आरोग्याच्या प्रश्नाचा विचार करून ठेकेदारास पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे. डॉ. सुनील बुकाने, आरोग्य अधिकारी
नगरसेवकांनी लक्ष द्यावे

स्वच्छता कर्मचा-यांच्या अपू-या संख्येमुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. त्यामुळे कर्मचा-यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. नगरसेवकांनीदेखील या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला हवे. रिजवान शेख, नागरिक