नाशिक- पावसाळ्यातीलसुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण कंपनीकडून दरवर्षी मान्सूनपूर्व दुरुस्ती देखभालीची कामे हाती घेतली जातात. मात्र, त्यातील कुचकामी नियोजनामुळे कमी वेगाचा वारा थोड्या पावसामुळेही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. रविवारीदेखील या कामांचे तीन तेरा वाजल्याचे दिसून आले. त्यामुळे वीजग्राहकांमध्ये महावितरणविरोधात तीव्र संताप आहे.
वाऱ्यामुळे विद्युत तारा एकमेकांना घासून वीजपुरवठा खंडित होतो. तसेच, झाडांच्या वाढलेल्या फांद्या तारांना लागून किंवा फांद्या तुटल्याने तारा तुटतात. अशा घटना टाळण्यासाठी मान्सूनपूर्व कामे हाती घेतली जातात. त्या अंतर्गत नादुरुस्त इन्सुलेटर बदलणे, ट्रान्सफॉर्मरचे ऑईल बदलणे अशी कामे केली जातात. यावर्षीही महावितरणने ही कामे केल्याचा दावा केला असला तरी, रविवारच्या वादळी पावसामुळे काही ठिकाणी तारा एकमेकांना घासल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शहर किमान तीन तास अंधारात होते. त्यामुळे महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे खरोखरच केली जातात किंवा नाही, याबाबत वीजग्राहकांमध्ये संभ्रम आहे. वीजदरांत वाढ करून अशीच असुविधा मिळणार असेल तर वीज बिल भरलेले चांगले, अशी ग्राहकांची मन:स्थिती झाली आहे.
टप्प्याटप्प्याने कामे सुरू
कामेकरताना पर्यावरणाचा -हास होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तसेच तारा भूमिगत करण्यासाठी खर्चही मोठा येत असल्याने ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. वैदेहीमोरे, जनसंपर्कअधिकारी, महावितरण
प्रतितास 50 रुपये भरपाई
न्यायालयानेवीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकाला प्रतितास 50 रुपये भरपाई देण्याचा निर्णय दिला आहे. त्यासाठी अभियंत्याच्या वेतनातून ती कपात करायची आहे. मात्र, महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे कारवाई होत नाही. विलासदेवळे, ग्राहकपंचायत
महावितरणनेवीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून कायमस्वरुपी नियोजन करण्याची गरज आहे. - संदीपबोराडे, वीजग्राहक