आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाणखी कंपन्यांना ‘पीएफ’कडून झटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम थकीत असलेल्या आस्थापनांकडून या रकमेसह दंड दंड व्याजाच्या वसुलीसाठी क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयाने कठाेर कारवाई सुरू केली असून, आजवर सात अास्थापनांवर कारवाई केली अाहे. ताज्या कारवाईत सातपूरमधील अॅडव्हान्स इलेक्ट्राॅनिक्स एशियन इलेक्ट्राॅनिक्स यांच्या काही मशिनरी जप्त करण्यात अाल्या अाहेत. या कारवाईने थकबाकीदार अास्थापनांचे धाबे दणाणले असून, कारवाईचा झटका बसण्यापूर्वीच थकबाकी भरण्यास संस्था प्राधान्य देत असल्याचे सकारात्मक चित्र दिसू लागले अाहे.

ते ३० सप्टेंबरदरम्यान पी. एफ. कार्यालय वसुली महिना राबवित असून, नाशिक क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयाचे अायुक्त जगदीश तांबे वसुली अधिकारी उषा शाेडे यांनी धडाक्यात ही माेहीम हाती घेतल्याने कामगार-कर्मचारी वर्गात अानंदाचे वातावरण अाहे. यापूर्वी नाशिक निफाड सहकारी साखर कारखाना, जिल्हा दूध उत्पादक संघ, पांडव इलेक्ट्रिकल्स, संकल्प वायनरी, विशाल उद्याेग यांच्यावर मशिनरी जप्तीची कारवाई करण्यात अाली अाहे. त्यानंतर अाता अॅडव्हान्स इलेक्ट्राॅनिक्सने दाेन लाख ८३ हजार १७०, तर एशियन इलेक्ट्रिकल्सकडे एक लाख ७४ हजार ३२३ रुपयांची थकबाकी वारंवार सूचना करूनही ती भरल्याने ही कारवाई करण्यात अाली. प्रवर्तन अधिकारी मनाेज काेळी, राजेंद्र शिरसाठ अाणि नंदू बकरे हे कारवाई करत अाहेत.

टाॅप अास्थापनांना करणार ‘लक्ष्य’
माेठ्या रकमा थकबाकीच्या स्वरूपात असलेल्या ६० अास्थापनांच्या क्षेत्रीय कार्यालयांना प्राधान्याने या कारवाईसाठी लक्ष्य केले जाणार असल्याची माहिती अाहे. यात अातापर्यंत बाेटावर माेजण्याएवढ्याच बड्या थकबाकीदार अास्थापनांवर कारवाई झालेली असली, तरी साेमवार ते बुधवारपर्यंत या कारवाईला अाणखी वेग येण्याची शक्यता अाहे.