आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षमतांविषयी शंका बाळगू नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- क्षेत्र कोणतेही असो, वा यशाची वाट कितीही खडतर असो, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मेहनत व र्शद्धा ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यशाला हमखास गवसणी घालता येते, असा बहुमोल कानमंत्र अपंगत्वावर मात करत शासकीय सेवेत नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या हंसराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. अपयशाने खचून न जाता, स्वत:मधील क्षमतांविषयी कधीही शंका बाळगू नका, अंतिम उद्दिष्ट सदैव स्मरणात ठेवा, असेही पाटील म्हणाले.
क. का. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयात गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी स्पर्धा परीक्षा विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी युनिव्हर्सल फाउण्डेशनचे संचालक डॉ. जी. आर. पाटील, राम खैरनार, भाग्यर्शी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आई-वडील, शिक्षकांची प्रेरणा व इच्छाशक्तीच्या बळावर यशस्वी होता येते, हा स्वानुभव सांगत असताना उपस्थित विद्यार्थी भावुक झाले अन् त्यांनी टाळ्यांची उत्स्फूर्त दाद दिली. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याच्या अनेक टिप्स पाटील यांनी या वेळी दिल्या. डॉ. जी. आर. पाटील व राम खैरनार यांनी स्पर्धा परीक्षांच्या बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाठय़क्रमातील पुस्तके व इतर दज्रेदार पुस्तकांचा अभ्यास नियमित केल्यास एका वर्षांत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
यशप्राप्तीच्या सोप्या टिप्स
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम काही मूलभूत गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत.
स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना ध्येय निश्चित करणे.
ठरवलेले उद्दिष्ट स्मरणात ठेवा.
सर्वांप्रती र्शद्धा व मेहनतीत सातत्य ठेवा.
स्वत:विषयी आत्मविश्वास बाळगा, नकारात्मक राहू नका.
क्षमता ओळखून प्रयत्न करा, अशा अनेक टिप्स पाटील यांनी दिल्या.